Join us

गेल्यावर्षी विमान उद्योगावर ५४२ कारवाया; विमान उद्योगाशी संबंधित ५७४५ घटकांची पडताळणी

By मनोज गडनीस | Published: January 03, 2024 7:07 PM

डीजीसीएची विक्रमी कामगिरी

मनोज गडनीस, मुंबई: देशातील विमानतळे, विमान कंपन्या आणि त्या क्षेत्राशी निगडीत घटकांतर्फे नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) गेल्यावर्षभरात ५७४५ घटकांची तपासणी केली आणि या दरम्यान अनियमितता आढळून आलेल्या ५४२ घटकांवर कारवाई केली आहे.

विमान क्षेत्रांतील घटकांतर्फे नियम पालनाची तपासणी करण्यासाठी डीजीसीएतर्फे संपूर्ण वर्षभरात अचानकपणे अशा पद्धतीची तपासणी केली जाते. मात्र, गेल्यावर्षी विमान क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएकडून केल्या जाणाऱ्या तपासणी संख्येत देखील वाढ झाली आहे. या तपासणी दरम्यान प्रामुख्याने, एअर इंडिया, एअर एशिया, इंडिगो, स्पाईस जेट या कंपन्यांना नियमांचे पालन न केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागला आहे. वैमानिकाच्या चुका, केबिन क्रूकडून झालेल्या चुका, विमानतळ प्रशासनातर्फे झालेल्या चुका, विमान प्रशिक्षण संस्थांतर्फे नियमांचे पालन न होणे अशा एकूण ४५२ प्रकरणांत डीजीसीएने कारवाई केली आहे.

टॅग्स :विमान