स्मार्ट सिटीअंतर्गत महावितरणची ५४५ कोटींची विकासकामे

By admin | Published: September 12, 2015 11:33 PM2015-09-12T23:33:22+5:302015-09-12T23:33:22+5:30

राज्यातील स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या ठाणे आणि नवी मुंबई शहरांसाठी अखंड व दर्जेदार वीजपुरवठा करण्याकरिता महावितरणने ठाणे विभागासाठी २९४ कोटी

545 crore development works of MSEDCL under Smart City | स्मार्ट सिटीअंतर्गत महावितरणची ५४५ कोटींची विकासकामे

स्मार्ट सिटीअंतर्गत महावितरणची ५४५ कोटींची विकासकामे

Next

ठाणे : राज्यातील स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या ठाणे आणि नवी मुंबई शहरांसाठी अखंड व दर्जेदार वीजपुरवठा करण्याकरिता महावितरणने ठाणे विभागासाठी २९४ कोटी तर नवी मुंबईसाठी २५१ कोटी अशी ५४५ कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन
खासदार राजन विचारे यांनी
दिले.
गुरुवारी ठाण्यात झालेल्या बैठकीत ठाणे शहर तसेच नवी मुंबईतील सद्य:स्थितीतील वीजपुरवठ्याचा त्यांनी आढावा घेतला. तेव्हा, ही माहिती देण्यात आली. उद्योग वृद्धिंगत होण्याकरिता आवश्यक वीजयंत्रणा विकसित करून पुढील दहा वर्षांत मागेल त्याला वीज मिळण्याच्या दृष्टीने महावितरणने पावले उचलावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.
महावितरणअंतर्गत ठाणे शहरातील ठाणे-१, ठाणे-२, ठाणे-३ तसेच वागळे इस्टेट हे विभाग येत
असून या विभागांमध्ये स्मार्ट
सिटीच्या अनुषंगाने एकत्रितरीत्या विद्युत विकास योजनेंतर्गत २९४.९३ कोटींची कामे प्रस्तावित केली
आहेत.
यामध्ये प्रामुख्याने २२/११ केव्ही क्षमतेची ५ उपकेंद्रे प्रस्तावित
असून १३७.४० किलोमीटरच्या वरील वीज वाहिन्यांचे रूपांतर भूमिगत
वीज वाहिन्यांमध्ये करण्यात
येणार आहे. तर, ११० किलोमीटरच्या नवीन भूमिगत वाहिन्यांचे
काम करण्यात येणार आहे.
दर्जेदार वीजपुरवठा व्हावा, याकरिता ६३० केव्ही क्षमतेची एकूण १८३ वितरण रोहित्रे बसविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

नवी मुंबई शहरात समावेश असलेल्या वाशी आणि नेरूळ या विभागांमध्येही आयपीडीएस योजनेंतर्गत एकूण २५१ कोटींची कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये वरील वीजवाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर करणे, अस्तित्वात असलेल्या २२/११ केव्ही क्षमतेच्या उपकेंद्राची क्षमता वाढवणे आदी कामांचा समावेश असल्याची माहिती महावितरणने या वेळी दिली.

Web Title: 545 crore development works of MSEDCL under Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.