जागतिक हवाई वाहतुकीला यंदा ५५ अब्जांचा तोटा?; आयएटीएने वर्तवली शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 02:20 AM2020-05-29T02:20:24+5:302020-05-29T02:20:39+5:30

सरकारी पातळीवरून हवाई वाहतूक क्षेत्रासाठी काही मदत व पॅकेजची व्यवस्था होणे गरजेचे आहे.

55 billion loss to global air transport this year ?; Possibility reported by IATA | जागतिक हवाई वाहतुकीला यंदा ५५ अब्जांचा तोटा?; आयएटीएने वर्तवली शक्यता

जागतिक हवाई वाहतुकीला यंदा ५५ अब्जांचा तोटा?; आयएटीएने वर्तवली शक्यता

Next

मुंबई : कोरोनाने जागतिक पातळीवर विळखा घातल्याने त्याचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राला यामुळे मोठा फटका बसला आहे. या वर्षी जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राला ५५ अब्ज डॉलर्सचा तोटा होण्याची शक्यता इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने (आयएटीए) वर्तवली आहे. ही वाढ तब्बल २८ टक्के आहे.

सरकारी पातळीवरून हवाई वाहतूक क्षेत्रासाठी काही मदत व पॅकेजची व्यवस्था होणे गरजेचे आहे. तरच हे क्षेत्र कर्जामधून तरेल; अन्यथा येत्या काळात हे क्षेत्र कर्जाच्या बोज्यामध्ये बुडण्याची भीती आहे, असे मत आयएटीएचे महासंचालक अलेक्झांड्रे डे जुनियँक यांनी व्यक्त केले आहे. हवाई वाहतूक क्षेत्राला असलेल्या या धोक्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लाखो जणांचे रोजगार धोक्यात आले आहेत.
अनेक कंपन्यांनी कर्मचारीकपात केली आहे तर अनेकांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० टक्के ते ४० टक्के कपात केली आहे. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येणाºया विविध भत्त्यांत व सुविधांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.

कोरोनामुळे अनेक देशांत विमान कंपन्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून दोन आसनांमध्ये एक आसन रिक्त ठेवावे लागत असल्याने त्याचा एकूण प्रवाशांच्या संख्येवरदेखील परिणाम होत आहे. दुसरीकडे विमान प्रवास करणे अत्यंत गरजेचे असेल तरच प्रवासी प्रवास करीत आहेत. या सर्व बाबींचा फटका एकूण आर्थिक उत्पन्न व कंपनीचा नफा व तोटा यावर होत आहे.२०१९ मध्ये जागतिक हवाई वाहतूक  क्षेत्राला ८३८ बिलीयन डॉलर्सचा महसूल प्राप्त झाला होता. भविष्यात अधिक मोठ्या आव्हानांना या क्षेत्राला सामोरे जावे लागण्याची भीती आहे.

सध्याचे आर्थिक संकट हे केवळ संकटाचे पहिले पाऊल आहे. कोरोनानंतरच्या काळात विमान कंपन्यांच्या आॅपरेशनवरील खर्चात मोठी वाढ होण्याची भीती आहे. विमान कंपन्यांना मिळालेले कर्ज परतफेड करण्यामध्ये कंपन्यांचा मोठा महसूल खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी विमान कंपन्यांनी प्रवाशांची, कर्मचाºयांची सुरक्षा व इतर बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय आयएटीएच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सोशल डिस्टन्सिंगमुळे आसनसंख्या कमी

च्कोरोनामुळे अनेक देशांत विमान कंपन्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून दोन आसनांमध्ये एक आसन रिक्त ठेवावे लागत असल्याने त्याचा एकूण प्रवाशांच्या संख्येवरदेखील परिणाम होत आहे. च्दुसरीकडे विमान प्रवास करणे अत्यंत गरजेचे असेल तरच प्रवासी प्रवास करीत आहेत. या सर्व बाबींचा फटका एकूण आर्थिक उत्पन्न व कंपनीचा नफा व तोटा यावर होत आहे.

Web Title: 55 billion loss to global air transport this year ?; Possibility reported by IATA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.