मतदार नोंदणीसाठी ५५ हजार २३९ नवे अर्ज

By admin | Published: October 14, 2016 07:06 AM2016-10-14T07:06:43+5:302016-10-14T07:06:43+5:30

महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून, मतदार नोंदणी मोहिमेलाही वेग आला आहे. महत्त्वाचे म्हणजे मतदार नोंदणी

55 thousand 239 new applications for voter registration | मतदार नोंदणीसाठी ५५ हजार २३९ नवे अर्ज

मतदार नोंदणीसाठी ५५ हजार २३९ नवे अर्ज

Next

मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून, मतदार नोंदणी मोहिमेलाही वेग आला आहे. महत्त्वाचे म्हणजे मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत उपनगर जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार २३९ नवे अर्ज दाखल झाले असून, मतदार नोंदणी मोहिमेचा शुक्रवार, १४ आॅक्टोबर हा शेवटचा दिवस आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व मतदार यादीत नाव असणाऱ्या नागरिकाला निवडणुकीत मतदान करता येणार आहे. नवीन मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणी अभियान महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. जे अधिकारी आपल्या विभागामध्ये जास्तीत जास्त नव मतदारांची नोंदणी करतील त्यांना तसेच ज्या सोसायट्यांमधून नव मतदारांची नोंदणी सर्वाधिक होईल त्या सोसायट्यांना रोख बक्षीस व प्रशस्तिपत्रक महापालिकेतर्फेदेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 55 thousand 239 new applications for voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.