राज्यातील ५६ जणांना राष्ट्रपती पोलीस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 06:18 AM2017-08-15T06:18:49+5:302017-08-15T10:18:15+5:30
शौर्यपूर्ण कामगिरी बजाविल्याबाबत राज्य पोलीस दलातील ५६ अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदक व शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई : पोलीस दलात गुणवत्तापूर्ण, उल्लेखनीय व शौर्यपूर्ण कामगिरी बजाविल्याबाबत राज्य पोलीस दलातील ५६ अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदक व शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. नागपूर परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, मुंबई गुन्हा अन्वेषण विभागातील अपर आयुक्त के.एम. प्रसन्ना, उपायुक्त निसार तांबोळी, दिलीप सावंत, एसीबीचे उपमहानिरीक्षक केशव पाटील आदींचा त्यामध्ये समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाकडून यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस नाईक दोगू अत्राम व कॉन्स्टेबल स्वरूप अमृतकर यांना मरणोत्तर पोलीस शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय यवतमाळ जिल्ह्याचे पोलीसप्रमुख एम. राजकुमार, साहाय्यक निरीक्षक नितीन माने, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, प्रफुल्ल कदम, विजय रत्नपारखी, हवालदार मोतीराम मडावी, मल्लेश केडमवार, नाईक जितेंद्र मारगये, गजेंद्र सौजल (सर्व गडचिरोली) व उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे (अहमदनगर) यांना शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.
>गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक
(कंसात पद व कार्यरत असलेले ठिकाण)
विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर (नागपूर परिक्षेत्र), के.एम. प्रसन्ना (अपर आयुक्त, गुन्हे शाखा), केशव पाटील (उपमहानिरीक्षक, एसीबी, मुंबई), अंकुश शिंदे (अपर आयुक्त गडचिरोली), बाळशीराम गायकर (उपायुक्त - पुणे शहर), प्रभाकर बुधवंत (अधीक्षक, लोहमार्ग पुणे), अनिल कुंभारे (उपायुक्त परिमंडळ-८, मुंबई), महेश घुर्ये (समादेशक, एसआरपीएफ, गट क्र. ८ मुंबई), दिलीप सावंत (उपायुक्त, गुन्हे प्रकटीकरण), राजेंद्र डहाळे (अधीक्षक, नंदूरबार), निसार तांबोळी (उपायुक्त, प्रकटीकरण, गुन्हे १), अनिल आकडे (उपअधीक्षक, पालघर), नागनाथ फोंडे (साहाय्यक आयुक्त, औरंगाबाद शहर), जयराम मोरे (साहाय्यक आयुक्त मुंबई), सुभाष सावंत (उपअधीक्षक, वर्धा), सर्जेराव पाटील (निरीक्षक, पुणे ग्रामीण), सुधीर कालेकर (निरीक्षक, मुंबई), विनायक वस्त (वरिष्ठ निरीक्षक, मुंबई), विवेक मुगळीकर (निरीक्षक, पुणे शहर), मधुकर कड (निरीक्षक नाशिक ), बजरंग कापसे (साहाय्यक निरीक्षक, सातारा), उपनिरीक्षक प्रकाश पोतदार (धुळे), विजय टक्के (ठाणे ग्रामीण), रामचंद्र कानडे (मुंबई), दिलीप माळी (धुळे), सुनील माने (एसआरपी, गट क्र. ७, दौंड), साहाय्यक फौजदार राजकुमार माने (पुणे), कैलास मोहोळ (पुणे), प्रकाश नाईक (एसआरपीएफ, गट क्र. १ पुणे), रौफ शेख (सोलापूर), मजोद्दीन शेख (एसीबी, जळगाव), सदाशिव शिंदे (एसआरपीएफ, गट क्र. २, पुणे), मदन गिते (चालक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना), लक्ष्मण गायकवाड (मुंबई), सुरेश जगताप (पुणे), नंदकिशोर परदेशी (एसआरपीएफ, गट क्र. ३, जालना), चंद्रकांत रघतवार (पुणे), हवालदार धनराज शिंदे (जळगाव), प्रकाश लंघे (पुणे), राम बागम (मुंबई), गुप्त वार्ता अधिकारी रघुनाथ फुके (राज्य गुप्त वार्ता, औरंगाबाद).
>उल्लेखनीय सेवेबद्दल मुंबई एटीएसचे साहाय्यक आयुक्त दिनेश अहिर, साहाय्यक फौजदार मुझफ्फर सय्यद (नाशिक) व सुरेंद्रनाथ आवळे (सांगली) यांना राष्टÑपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ४३ अधिकारी व अंमलदारांना पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
>कारागृह सेवा गुणवत्ता पदक : प्रकाश उकरंडे (अधीक्षक, येरवडा कारागृह) व रमेश धुमाळ (हवालदार कळंबा कारागृह, कोल्हापूर)