शिवशाही प्रकल्पातील ५६ टक्के पदे रिक्त
By admin | Published: October 28, 2016 04:06 AM2016-10-28T04:06:44+5:302016-10-28T04:06:44+5:30
शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित कंपनीतील (एसपीपीएल) तब्बल ५६ टक्के पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांतून समोर आले आहे.
मुंबई : शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित कंपनीतील (एसपीपीएल) तब्बल ५६ टक्के पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांतून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मिळवली आहे.
कंपनीत सर्व प्रकाराची एकूण ७३ पदे आहेत, ज्यापैकी फक्त ३२ पदे कार्यरत असून, ४१ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक रिक्त पदे उपसमाज अधिकारी यांची आहेत. ११ पैकी ४ पदावर अधिकारी कार्यरत आहेत. स्टेनोेची चारही पदे रिक्त आहेत. महाव्यवस्थापकांची ३ पैकी २ पदे रिक्त आहेत. व्यवस्थापकांची ४ पैकी ३ पदे रिक्त आहेत. सहव्यवस्थापकीय संचालक, सर्व्हेअर, अधीक्षक, लेखा अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, उपमुख्य अभियंता, सहायक
अभियंता, कनिष्ठ अभियंता, तंत्र सहायक, वास्तुविशारद, डीआईएलआर, समाजविकास अधिकारी, सिलेक्शन ग्रेड स्टेनो, झेरोक्स आॅपरेटर ही पदेही रिक्त आहेत. (प्रतिनिधी)