मुंबईत ५६ हजार चाचणी; ३२२ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:09 AM2021-08-21T04:09:43+5:302021-08-21T04:09:43+5:30
मुंबई - महापालिकेने शुक्रवारी ५६ हजार ५६६ नागरिकांची चाचणी केली. यापैकी केवळ ३२२ बाधित रुग्ण सापडले आहेत. तर ...
मुंबई - महापालिकेने शुक्रवारी ५६ हजार ५६६ नागरिकांची चाचणी केली. यापैकी केवळ ३२२ बाधित रुग्ण सापडले आहेत. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०३ टक्के एवढा आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख ४० हजार ६१२ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख १९ हजार ३८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ९४१ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या दोन हजार ८५३ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात २२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दररोज सरासरी ३० ते ३५ हजार नागरिकांची चाचणी केली जाते.
शुक्रवारी मात्र तब्बल ५६ हजार ५६६ नागरिकांची चाचणी करण्यात आली होती. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या सहा रुग्णांपैकी तीन रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये एक महिला तर पाच पुरुष रुग्णांचा समावेश होता. यापैकी मृत झालेला एक रुग्ण ४० वर्षांखालील होता. तर पाच मृत ६० वर्षांवरील होते. आतापर्यंत ८८ लाख ५५ हजार पाच चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.