मध्य रेल्वेवर किसान रेल्वेच्या ५६७ फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:09 AM2021-09-10T04:09:58+5:302021-09-10T04:09:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेवर गेल्यावर्षी ७ ऑगस्टला सुरू झालेल्या किसान रेल्वेच्या ५६७ फेऱ्या झाल्या आहेत. आतापर्यंत ...

567 rounds of Kisan Railway on Central Railway | मध्य रेल्वेवर किसान रेल्वेच्या ५६७ फेऱ्या

मध्य रेल्वेवर किसान रेल्वेच्या ५६७ फेऱ्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मध्य रेल्वेवर गेल्यावर्षी ७ ऑगस्टला सुरू झालेल्या किसान रेल्वेच्या ५६७ फेऱ्या झाल्या आहेत. आतापर्यंत १.९५ लाख टन नाशवंत वस्तूंची वाहतूक करण्यात आली आहे. ५६७ वी किसान रेल्वे ६ सप्टेंबर रोजी निफाडहून न्यू गुवाहाटीला निघाली. पहिली किसान रेल्वे देवळाली ते दानापूरपर्यंत सुरू झाली आणि मागणीनुसार ती मुजफ्फरपूरपर्यंत वाढवली गेली.

महाराष्ट्राचे डाळिंब देवळाली - मुजफ्फरपूर किसान रेल्वेला जोडलेल्या सांगोला- मनमाड लिंक किसान रेल्वेद्वारे दूरच्या बाजारपेठांमध्ये पोहोचले. नागपुरातील संत्रे दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये त्वरित आणि नव्याने पोहोचले. ऑपरेशन ग्रीन - टॉप टू टोटल या ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’च्या अंतर्गत सरकारच्या व्हिजनचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना ५० टक्के सबसिडीदेखील वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी रेल्वे पहिली पसंती बनली आहे.

किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी वरदान

मध्य रेल्वे देवळाली ते मुजफ्फरपूर, सांगोला ते मुझफ्फरपूर, सांगोला ते आदर्श नगर दिल्ली, सांगोला ते शालिमार, रावेर ते आदर्श नगर दिल्ली आणि सावदा ते आदर्श नगर दिल्लीपर्यंत ६ किसान रेल चालवत आहे. आता किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली. कारण त्यांचे उत्पादन कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचत आहे.

Web Title: 567 rounds of Kisan Railway on Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.