मुंबई - मुंबईत रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मुंबईत दिवसभरात ५७५ रुग्ण आणि १४ मृत्यू झाले आहेत. मागील २४ तासात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ७१८ आहे, तर आतापर्यंत एकूण ६ लाख ८४ हजार ८२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७०२ दिवसांवर पोहोचला आहे. ८ ते १४ जून पर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.०९ टक्के आहे. शहर उपनगरात सध्या १५ हजार ३९० सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत ७ लाख १७ हजार ६८३ कोरोनाबाधित असून, मृतांची संख्या १५ हजार २१६ आहे. दिवसभरात २३ हजार ६८१ चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ६६ लाख ६४ हजार ३२२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील चाळ व झोपडपट्टीच्या परिसरात १८ सक्रिय कंटेंटमेंट झोन आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ८६ आहे.
सक्रिय रुग्णांमध्ये ६१ टक्के लक्षण विरहित रुग्ण
मुंबईतील एकूण रुग्णांमध्ये ९ हजार ५२८ लक्षणं विरहित रुग्ण आहेत तर ४ हजार ९४८ लक्षणे असलेले रुग्ण आहेत. १ हजार ७४ रुग्ण गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लक्षणविरहित रुग्णांचे प्रमाण टक्केवारीत ६१ टक्के आहे तर लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण ३२ टक्के आहे. तर गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण ७ टक्के आहे.