ठाण्यात ५८ इमारती अतिधोकादायक

By admin | Published: May 22, 2015 10:58 PM2015-05-22T22:58:37+5:302015-05-22T22:58:37+5:30

ब्य्रात घडलेल्या लकी कंपाऊड इमारत दुर्घटनेनंतर पालिकेने यंदाही पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण केला

58 buildings in Thane are highly scarce | ठाण्यात ५८ इमारती अतिधोकादायक

ठाण्यात ५८ इमारती अतिधोकादायक

Next

ठाणे : मुंब्य्रात घडलेल्या लकी कंपाऊड इमारत दुर्घटनेनंतर पालिकेने यंदाही पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण केला असून शहरात आजच्या घडीला ५८ अतिधोकादायक इमारती असून त्यामध्ये १०८२ कुटुंबाचे वास्तव्य
आहे. तसेच भोगवटादारांची संख्या ४८७६ एवढी आहे. धोकादायक इमारतींची संख्या २५६६ एवढी
असून यामध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाची संख्या ७६ हजार ९४१ एवढी आहे.
विशेष म्हणजे या इमारतीत राहणाऱ्या भोगवटाधारांची संख्या ३ लाख ५६ हजार ३० एवढी आहे. अतिधोकादायक इमारती या पावसाळ्यापूर्वी रिकाम्या केल्या जातील असा दावा पालिकेने केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींची संख्या वाढली असून अतिधोकादायक इमारतींची संख्या ही ५ ने कमी झाली आहे. परंतु धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये अनधिकृत इमारतींची संख्या ही अधिक असल्याची माहितीही समोर आली आहे.
मान्सुनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांनी अतिक्रमण विभागाची एक बैठक घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी इमारतींचा सर्व्हे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या.

दोस्ती रेंटलमध्ये
७०० घरे आजही रिकामी
४महापालिकेने शहरातील इमारत दुर्घटनेत बाधीत झालेल्या रहिवाशांचे वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल हौसिंग स्कीममध्ये पुनर्वसन केले आहे.
४येथे १४४८ घरे असून ७४८ रहिवाशांचे येथे पुनर्वसन करण्यात आले असून आजच्या घडीला ७०० घरे रिकामी आहेत. त्याठिकाणी अथवा पालिकेच्या संक्रमण शिबिरात अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या ही पाचने घटली असून ५८ अतिधोकादायक इमारती शहरात आहेत. यामध्ये १८ अधिकृत आणि ४० अनधिकृत इमारतींचा समावेश आहे. तसेच या इमारतीत आज १०८२ कुटुंबाचे आणि ४८७६ भोगवटाधारकांचे वास्तव्य आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारतींची संख्या १५७ ने वाढली असून शहरात आजमितीला २७०१ इमारती या धोकादायक स्थितीत आहेत.
यामध्ये ४१४ अधिकृत आणि २१४२ अनधिकृत इमारतींचा समावेश आहे. तर यामध्ये ७६ हजार ९४१ कुटुंबांचे वास्तव्य असून ३ लाख ५६ हजार ३० भोगवटाधारक या इमारतीत राहत आहेत.

शिल्लक इमारतींपैकी १० दुरुस्त करण्यात आल्या होत्या. तसेच ३ इमारतींवर न्यायालयीन स्थगिती होती. एकूणच नंतर १४ पैकी १० इमारतींवर कारवाई करण्यात येऊन केवळ ४ इमारती शिल्लक राहिल्या होत्या.

मध्ये पालिकेने जाहीर केलेल्या यादीत शहरात २५४४ धोकादायक आणि ६३ अतिधोकादायक इमारती होत्या. अतिधोकादायक इमारतींपैकी ४२ इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे मुंब्रा प्रभाग समितीत धोकादायक ६०९ आणि अतिधोकादायक १३ अशा एकूण ६२२ इमारती आहेत. परंतु पूर्वी याच प्रभाग समितीत असलेल्या परंतु आता नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग क्र. ६३,६४ आणि ६५ मध्ये ८१० इमारती धोकादायक आणि १४ अतिधोकादायक अशा मिळून एकूण ८२४ इमारतींचा समावेश आहे. यात खास बाब म्हणजे या सर्वच इमारती अनधिकृत असून यामध्ये एकाही अधिकृत इमारतीचा समावेश नाही.

Web Title: 58 buildings in Thane are highly scarce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.