दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 07:00 AM2024-11-01T07:00:15+5:302024-11-01T07:00:39+5:30

भारतीय रेल्वेने गेल्यावर्षी या कालावधीत एकूण ४,५०० सेवा चालविल्या होत्या. यावर्षी तोच आकडा ७,२९६ वर पोहोचला आहे.

583 trains of Central Railway on the occasion of Diwali, Chhat Puja | दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

मुंबई : दिवाळी आणि छटपूजेसाठी प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने ५८३ आरक्षित आणि अनारक्षित  विशेष गाड्या सोडल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर विभागातून उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी या भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वातानुकूलित, शयनयानासह अनारक्षित मिश्र व्यवस्था असलेल्या गाड्यांचा समावेश आहे.

भारतीय रेल्वेने गेल्यावर्षी या कालावधीत एकूण ४,५०० सेवा चालविल्या होत्या. यावर्षी तोच आकडा ७,२९६ वर पोहोचला आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते भारताच्या विविध भागांमधून वर्षातील ३०० ते ३२० दिवस बहुसंख्य प्रवासी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर अशा भागांमध्ये कामानिमित्त येत असतात. दिवाळी व छटपूजा अशा सणांनिमित्त ३० ते ४० दिवसांच्या कालावधीत हे प्रवासी मुंबई आणि इतर भागांतून त्यांच्या स्वगृही परततात.

उपाययोजना
    महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘मे आय हेल्प यू’ बूथ उभारण्यात आले.
 विविध स्थानकांवर तिकीट काउंटरची संख्या वाढवली.
 प्रमुख स्थानकांवर प्रवासी ‘होल्डिंग एरिया’.
    अतिरिक्त आरपीएफ कर्मचारी आणि तिकीट तपासणीस तैनात.

महाराष्ट्रातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड अशा विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी उत्सव विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बेंगळुरू आणि इतर ठिकाणांसारख्या विविध ठिकाणी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.

Web Title: 583 trains of Central Railway on the occasion of Diwali, Chhat Puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.