मुंबई : कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५ दिवसांवर आलेल्या उत्तर मुंबईतील अनेक भागात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र त्याच दरम्यान मालाड परिसरातून ५९ कोरोनाबाधित रुग्ण बेपत्ता असून महापालिकेने त्यासाठी पोलिसांकडे मदत मागितली होती. याप्रकरणी काही तक्रार करण्यात आली नसली तरी चार पोलीस ठाण्यांना ‘मिसिंग’ लोकांची यादी व्हॉट्सअॅपमार्फत पाठविण्यात आली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.उत्तर मुंबईमध्ये रेड तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये कडक निर्बंध लावत लॉकडाऊन करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेला पोलीसही संपूर्ण सहकार्य करत आहेत. मात्र तरीही मालाड परिसरातून जवळपास ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता झाल्याचे मंगळवारी उघड झाले. पालिकेच्या पी उत्तर विभागाकडून या बेपत्ता रुग्णांना शोधण्यासाठी पोलिसांकडे मदत मागण्यात आली. मात्र पालिकेकडून अशी कोणतीही तक्रार नसल्याचे अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग) दिलीप सावंत यांनी सांगितले. बेपत्ता रुग्णांना शोधण्याची जबाबदारी मालाड, मालवणी, दिंडोशी आणि कुरार पोलिसांकडे होती. त्यात मालवणीत १८पैकी ८ तर दिंडोशीत १३पैकी दहा जण वेगवेगळ्या रुग्णालयातच सापडल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण ४७ जणांना पोलिसांनी शोधले असून अन्य १३ जणांचा शोध सुरू आहे.>मालवणीत १८ पैकी ८ तर दिंडोशीत १३ पैकी दहा जण वेगवेगळ्या रुग्णालयातच सापडल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
CoronaVirus News : मालाडमधून ५९ कोरोना रुग्ण बेपत्ता?, ४६ जणांना शोधण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 1:31 AM