५९ टक्के घरगुती वीज ग्राहकांची बिले थकली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 05:34 PM2020-11-19T17:34:25+5:302020-11-19T17:34:50+5:30

electricity bills : सवलतींच्या फसव्या घोषणांमुळे थकबाकीत वाढ ?

59% of household electricity bills are exhausted | ५९ टक्के घरगुती वीज ग्राहकांची बिले थकली

५९ टक्के घरगुती वीज ग्राहकांची बिले थकली

Next

सवलतींच्या फसव्या घोषणांमुळे थकबाकीत वाढ ?

लाँकडाऊन काळातील ४,५०० कोटी रुपयांचा भरणा नाही

मुंबईतील थकबाकीदारांचा टक्का २५ पेक्षा कमी   

मुंबई : राज्यातील ५९ टक्के घरगुती वीज ग्राहकांनी लाँकडाऊन काळातील वाढीव वीज बिलांचा नियमित भरणा केलेला नाही. या ग्राहकांकडील एकूण थकबाकी ५ हजार ७७६ कोटी इतकी असून  त्यापैकी सुमारे साडे चार हजार कोटींची थकबाकी लाँकडाऊन काळातली आहे. वीज बिले थकविण्यात मुंबईकर वीज ग्राहकांची संख्या जेमतेम २५ टक्के असून उर्वरित महाराष्ट्रात तो टक्का ६४ पेक्षा जास्त आहे. मुंबईतील अदानी, टाटा, बेस्ट या तीन कंपन्यांपैकी नियमित भरणा करण्यात बेस्टचे ग्राहक पुढे आहे. तिथे बिल थकविणा-या ग्राहकांची संख्या फक्त १६ टक्के असली तरी थकबाकीची रक्कम मात्र ३४ टक्के आहे.

लाँकडाऊन काळातील वाढीव वीज बिलांचा भार कमी करण्यासाठी सवलत दिली जाईल असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत सातत्याने देत होते. मुंबईतील खासगी वीज वितरण कंपन्यांनीसुध्दा तशी सवलत द्यावी असे आवाहनही राऊत यांनी केले होते. मात्र, ही सवलत देणे अशक्य असल्याचे आता खुद्द राऊत यांनीच मान्य केले असून वीज ग्राहकांमध्ये त्यामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वीज बिलांचा भरणा न होण्यामागे आर्थिक संकट प्रामुख्याने कारणीभूत असले तरी राज्य सरकारकडून सवलत मिळेल या भाबड्या आशेपोटी अनेकांनी बिलांचा भरणा केलेला नाही अशी माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे. त्यामुळेच महावितरणच्या थकबाकीदारांचा टक्का मुंबईपेक्षा अडीच पट असल्याचेही त्यांनी सांगितले.  राज्यातील एकूण घरगुती वीज ग्राहक २ कोटी ४२ हजार असून त्यापैकी १ कोटी ४४ लाख ग्राहकांची बिले थकली आहेत.

उद्योग , व्यवसायांची थकबाकी वाढली

कोरोना संक्रमणाचा मोठा फटका राज्यातील उद्योगधंदे आणि व्यवसायांना बसला आहे. लघु आणि उच्चदाब विजेचा वापर करणा-या उद्योगांची थकबाकी १७६२ कोटी आणि व्यावसायिक अस्थापनांची थकबाकी १४१४ पर्यंत वाढली आहे. या ३१७६ कोटींपैकी १६४० कोटी म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त थकबाकी एप्रिल ते आँक्टोबर या कालावधीतली आहे. 

 

वीज ग्राहक, थकबाकीदार आणि थकबाकीची रक्कम

वितरण कंपनी

एकूण ग्राहक

थकबाकीदार

थकबाकी (कोटींमध्ये)

महावितरण

२,०८,१८,१८४

१३४५२३१४

५०००

अदानी

२०२७६५१

७१३०८९

३८५

बेस्ट

७,५२,७९२

१२०४३६

२३१

टाटा

६,७९,७४०

१४८२५७

५६

 

Web Title: 59% of household electricity bills are exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.