राज्यात दिवसभरात ५९ हजार ३१८ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:06 AM2021-05-17T04:06:13+5:302021-05-17T04:06:13+5:30
मुंबई : राज्यात सातत्याने दैनंदिन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात रविवारी ५९ हजार ३१८ रुग्ण बरे ...
मुंबई : राज्यात सातत्याने दैनंदिन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात रविवारी ५९ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.७४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर सध्या ४ लाख ६८ हजार १०९ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात ३४ हजार ३८९ रुग्ण आणि ९७४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५३ लाख ७८ हजार ४५२ असून, मृतांचा आकडा ८१ हजार ४८६ आहे. राज्यातील मृत्यूदर १.५२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ११ लाख ३ हजार ९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.२९ टक्के पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३४ लाख ९१ हजार ९८१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून, २८ हजार ३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ९७४ मृत्यूंपैकी ४१५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २५३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत, तर २५३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३०६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ९७४ मृत्यूंमध्ये मुंबई ६०, ठाणे १२, ठाणे मनपा १५, नवी मुंबई मनपा ८, पालघर ८, वसई-विरार मनपा १९, रायगड २०, पनवेल मनपा १०, नाशिक २४, नाशिक मनपा १८, मालेगाव मनपा २, अहमदनगर १६, जळगाव २४, जळगाव मनपा ७, नंदुरबार ९, पुणे १८, पुणे मनपा ४४, सोलापूर ७८, सोलापूर मनपा ७, सातारा ८, कोल्हापूर ८१, कोल्हापूर मनपा १७, सांगली २९, सांगली मिरज कुपवाड मनपा ५, सिंधुदुर्ग १०, औरंगाबाद ४४, औरंगाबाद मनपा १, जालना १३, हिंगोली १, परभणी ६, परभणी मनपा १४, लातूर १६, लातूर मनपा १, बीड ३६, नांदेड ३५, नांदेड मनपा ८, अकोला १, अमरावती २८, अमरावती मनपा १०, यवतमाळ १७, बुलडाणा १, वाशिम १२, नागपूर ३१, नागपूर मनपा ७३, वर्धा ६, गोंदिया १, चंद्रपूर ३२, चंद्रपूर मनपा २३, गडचिरोली ६ इ.रुग्णांचा समावेश आहे.
पुण्यातील उपचाराधीन रुग्ण घटले
राज्यात पुण्यात सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण असून, मागील काही दिवसांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आले आहे. सध्या पुण्यात ८२ हजार ३९७ रुग्ण, मुंबईत ३३ हजार ५७४, ठाण्यात ३० हजार ४९२, नाशिकमध्ये २१ हजार ९४०, नागपूरमध्ये ३२ हजार २२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.