ब्रिटनहून मुंबईत ५९० प्रवासी दाखल; प्रत्येकाची तपासणी, खबरदारी म्हणून केले हॉटेलमध्ये क्वारंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 06:29 AM2020-12-23T06:29:20+5:302020-12-23T06:29:46+5:30

Mumbai : परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

590 migrants arrive in Mumbai from UK; Check everyone, as a precaution, quarantine in the hotel | ब्रिटनहून मुंबईत ५९० प्रवासी दाखल; प्रत्येकाची तपासणी, खबरदारी म्हणून केले हॉटेलमध्ये क्वारंटाइन

ब्रिटनहून मुंबईत ५९० प्रवासी दाखल; प्रत्येकाची तपासणी, खबरदारी म्हणून केले हॉटेलमध्ये क्वारंटाइन

Next

मुंबई : मुंबईत येणाऱ्या परदेशी प्रवाशांना सोमवारी मध्यरात्रीपासून क्वारंटाइन करण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने घेतला. त्यानंतर आतापर्यंत प्रवासात असलेली पाचपैकी तीन विमाने ब्रिटन येथून मुंबईत दाखल झाली आहेत. या तीन विमानांतून एकूण ५९० प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले. यापैकी अद्याप काेणाला लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र खबरदारी म्हणून प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. पाच दिवसांनंतर त्यांची चाचणी करण्यात येईल.
परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी महापालिकेने पंचतारांकित व फोर स्टार हॉटेलमध्ये दोन हजार खोल्या राखीव ठेवल्या आहेत. 
सोमवार रात्रीपासून तीन विमाने मुंबईत आली आहेत. या प्रवाशांचे तापमान व अन्य तपासणी करून त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.

अन्य राज्यांतील प्रवाशांची रवानगी
ब्रिटनमधून येणारे २३६ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील असल्याने त्यांनी आपल्या राज्यात पाठविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले असून, अन्य राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येईल. याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना कळविण्यात आले आहे, असे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

विमानांनी आलेले प्रवासी
AI - १३० या विमानाने २५० प्रवासी मुंबईत आले. ६३ मुंबई, ७५ महाराष्ट्र, ११२ राज्याबाहेरील आहेत.
VS - ३५४ या विमानाने ११५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ५२ मुंबई, ३० महाराष्ट्र, ३३ महाराष्ट्राबाहेरील आहेत.
BA - १३९ या विमानाने २२५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ७२ मुंबईमधील, ६२ महाराष्ट्रातील तर ९१ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील आहेत.  

Web Title: 590 migrants arrive in Mumbai from UK; Check everyone, as a precaution, quarantine in the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.