मुंबईत ६१ वे अवयवदान; चार जणांना नवसंजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:52 AM2019-09-26T00:52:42+5:302019-09-26T00:52:49+5:30

मुंबईत २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अवयवदानाची आकडेवारी वाढल्याचे दिसून येत आहे

5th component in Mumbai; Four newborns! | मुंबईत ६१ वे अवयवदान; चार जणांना नवसंजीवनी!

मुंबईत ६१ वे अवयवदान; चार जणांना नवसंजीवनी!

googlenewsNext

मुंबई : मुंबईत २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अवयवदानाची आकडेवारी वाढल्याचे दिसून येत आहे. मुंबईत यंदाच्या वर्षातील ६१ वे अवयवदान पार पडले आहे. हे अवयवदान सप्टेंबर महिन्यातील पाचवे आहे. २०१८ साली मुंबईत वर्षभरात ४८ वेळा अवयवदान झाले होते. २०१९ सालच्या ९ महिन्यांतच अवयवदानाने उच्चांक गाठला आहे.

मुलुंडच्या खासगी रुग्णालयात बुधवारी ६१ वे अवयवदान पार पडले. ५४ वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवनदान मिळण्यास मदत झाली आहे. रुग्ण ब्रेनडेड झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडे अवयवदानाची परवानगी मागण्यात आली. कुटुंबीयांच्या परवानगीनंतर या रुग्णाचे हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे दान करण्यात आली आहेत. यात हृदय आणि एक मूत्रपिंड त्याच रुग्णालयातील दोन रुग्णांना दान करण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड आणि यकृत हे अवयव इतर रुग्णालयांत पाठविण्यात आले
आहे.

सप्टेंबर महिन्यातील हे पाचवे अवयवदान पार पडले. २१ सप्टेंबर रोजी २५ वर्षीय तरुणाचे हृदय, दोन्ही मूत्रपिंडे आणि यकृत दान करण्यात आले, तर १७ सप्टेंंबर रोजी ३३ वर्षीय व्यक्तीचे यकृत दान करण्यात आले. आपल्या प्रिय व्यक्तीचे अवयवदान केल्याने इतरांचा जीव वाचेल, या भावनेतून दोन्ही ब्रेनडेड रुग्णांच्या कुटुंबांनी अवयवदानाला परवानगी दिली. मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. एस. के. माथुर यांनी सांगितले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अवयवदान चांगले झाले आहे. अवयवदानात राज्य पहिल्या स्थानी आहे, जनजागृतीमुळे हे शक्य झाले आहे.

Web Title: 5th component in Mumbai; Four newborns!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.