१९ बँकांना तब्बल ६,५२४ कोटींचा गंडा; आयएल अँड एफएस विरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 05:40 AM2023-06-04T05:40:27+5:302023-06-04T05:41:23+5:30

२०१८ साली कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे. 

6 524 crore to 19 banks case filed against il and fs | १९ बँकांना तब्बल ६,५२४ कोटींचा गंडा; आयएल अँड एफएस विरुद्ध गुन्हा दाखल

१९ बँकांना तब्बल ६,५२४ कोटींचा गंडा; आयएल अँड एफएस विरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) या कंपनीची उपकंपनी असलेल्या आयएल अँड एफएस टान्स्पोर्टेशन कंपनीने देशातील प्रमुख १९ बँकांची तब्बल ६५२४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने कंपनी व संबंधित अशा एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये कंपनीने हा घोटाळा केल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये नमूद केले आहे. कंपनीने केलेल्या घोटाळ्याचा प्रामुख्याने पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक आणि अन्य बँकांना फटका बसला आहे. २०१८ साली कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे. 

 कंपनीच्या संचालकांनी कंपनीची आर्थिक स्थितीशी निगडित कोणतीही कायदेशीर शिस्त पाळली नाही, कंपनीने समूहातील कंपन्यांतच मोठ्या प्रमाणावर चक्राकार पद्धतीने आर्थिक व्यवहार केले. सेबीने कंपनीला जे निर्देश दिले होते त्यांचेदेखील पालन कंपनीने केले नाही, असा आरोप कंपनीवर आहे. याखेरीज कंपनीने मोठ्या प्रमाणावर पैसे हे कोणत्याही नोंदीशिवाय फिरवल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. तर, संचालकांच्या हितसंबंधांतील व्यक्ती व संस्था यांच्यासोबत कंपनीने व्यवहार केल्याचेही या प्रकरणात झालेल्या फोरेन्सिक ऑडिटमध्ये आढळून आले आहे.

घेतलेल्या कर्जाचा केला दुरुपयोग

देशातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीत कार्यरत असलेल्या या कंपनीने १९ 
बँकांकडून हे कर्ज घेतले होते. मात्र, कंपनीमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर २०१८ साली राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने (एनसीएलटी) कंपनीमध्ये नवे संचालक मंडळ स्थापन केले. त्यानंतर कंपनीच्या पूर्व संचालकांनी केलेला आर्थिक घोटाळा उजेडात आला आहे.


 

Web Title: 6 524 crore to 19 banks case filed against il and fs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.