मुंबईतील जुहू चौपाटीवर काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समुद्रात पोहायला गेलेली ६ मुलं बुडाली. यातील दोन जणांना स्थानिक मच्छिमारांनी सुखरुप वाचवलं. तर इतर चार जणांचा शोध घेतला जात होता. यासाठी समुद्र किनाऱ्यावरील लाइफगार्ड तसंच नौदलाच्या हेलिकॉप्टरनंही सर्च ऑपरेशन काल रात्री राबवण्यात आलं. पण समुद्राला भरती आणि अंधारामुळे शोध कार्यात अडथळे आले होते. अखेर आज सकाळी वाहून गेलेल्या चार जणांपैकी दोघांचे मृतदेह किनाऱ्यावर आले आहेत. जुहू येथील रामाडा हॉटेलजवळच्या किनारपट्टीवर दोघांचे मृतदेह सापडले आहेत.
सांताक्रूझ पूर्वेच्या वाकोला येथील ८ मुलं जुहू चौपाटीवर खेळण्यासाठी गेले होते. जुहू कोळीवाडा जेट्टी येथे टोकाला बसलेले असताना आलेल्या लाटेमुळे ८ पैकी ६ मुलं पाण्यात वाहून गेली. यातील दोन जणांना वाचवण्यात यशं आलं होतं. धर्मश वलजित भुजियावय (15), मनिष योगेश भोगनिया (15), शुभम योगेश भोगनिया (16), जय रोशन ताजभरिया (16) अशी पाण्यात बुडालेल्या मुलांची नावं आहेत.