नाट्यदिंडीत आरवणार ६ फुटांचा कोंबडा; ४०० लोककलावंतांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:10 AM2018-06-07T01:10:28+5:302018-06-07T01:10:28+5:30

मुलुंडमध्ये १३ जूनपासून सुरू होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद््घाटनापूर्वी काढल्या जाणाºया दिंडीत यंदा कोकणातील गावागावांत प्रसिद्ध असलेला सहा फुटी कोंबडा हे प्रमुख आकर्षण असणार आहे.

6-foot cocktail will be played in theater; 400 people participated in the workshop | नाट्यदिंडीत आरवणार ६ फुटांचा कोंबडा; ४०० लोककलावंतांचा सहभाग

नाट्यदिंडीत आरवणार ६ फुटांचा कोंबडा; ४०० लोककलावंतांचा सहभाग

Next

- अजय परचुरे

मुंबई : मुलुंडमध्ये १३ जूनपासून सुरू होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद््घाटनापूर्वी काढल्या जाणाºया दिंडीत यंदा कोकणातील गावागावांत प्रसिद्ध असलेला सहा फुटी कोंबडा हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
नाट्यसंमेलनाच्या प्रत्येक गोष्टीत वेगळेपणाची कास धरणाºया यंदाच्या नाट्यसंमेलनातील दिंडीही अनोख्या आणि भव्य स्वरूपात काढली जाणार आहे. महाराष्ट्रातील १६ लोककला प्रकारांतील ४०० लोककलावंत या नाट्यदिंडीतूनच लोककला सादर करणार असून, त्या कलावंतांना एकत्र आणण्याचे कसब पार पाडत आहेत, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे.
महाराष्ट्रातील लोप पावत असलेल्या लोककलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नाट्यपरिषदेने संमेलनाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांना नाट्यदिंडीत मानाचे स्थान देऊन या नाट्यसंमेलनाच्या उद््घाटनापूर्वीपासूनच त्याचे वेगळेपण ठसवण्याचा प्रयत्न केला आहे.
यात आदिवासी ढोल, आदिवासी बोहाडा, आदिवासी तारपा, धनगरी गोफ, धनगरी गजो, कातरखेळ, भाल्या, दशावतार, लेजीम, दांडपट्टा, कोकणात नाचवली जाणारी पालखी, आळंदीची पावले, कोळीनृत्य, सातारी दांडपट्टा अशा लोककलांमधील कलावंत कला सादर करत-करत दिंडीसोबत जातील. नाट्यसंमेलनाच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोककलावंतांचा सहभाग पहिल्यांदाच होईल. ग्रामीण भागातील ४,५०० कलावंत शहरी रसिकांसमोर कला सादर करतील.
मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातून दुपारी ४ वाजता या नाट्यदिंडीला सुरुवात होईल. एम. जी. रोड, पाचरस्ता अशी मार्गक्रमणा करत ती संमेलनस्थळी म्हणजेच महाकवी कालिदास नाट्यगृहाच्या प्रांगणात पोहोचेल. ढोलताशा पथकाच्या मागे आणि पुढे १६ लोककला प्रकारांचे सादरीकरण ४०० लोककलावंत करतील. सांगलीतून येणाºया लेजीमपथकात ४५ वर्षांपासून ते ७८ वर्षांपर्यंतचे कलावंत आहेत. नाशिक, मोखाडातील आदिवासी संमेलनात पहिल्यांदाच सहभागी होतील. कोकणातील मार्गताम्हाणे गावचे रहिवासी पालखी नाचवण्याची कला सादर करतील.

कलावंतांचे पथक : या नाट्यदिंडीमध्ये ४०० लोककलावंतांसोबत ढोलताशा पथकात मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्रीही सहभागी होणार आहेत. पुण्यात दरवर्षी होणाºया गणेशोत्सव मिरवणुकीत हे सेलिब्रेटी पथक नेहमी भाग घेते. यंदा नाट्यदिंडीत ते पथक पहिल्यांदाच सामील होणार आहे.

१६ लोककला आणि ४०० लोककलावंतांना घेऊन मी या नाट्यदिंडीचं अनोखं दर्शन मुंबईकरांना करून देणार आहे. या लोककला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोककलावंत तितक्याच ताकदीनं सादर करतील. नाट्यपरिषदेनं या लोककलावंतांना संधी देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचं मोठं काम केलं आहे. त्याचं नेतृत्व माझ्या हाती देऊन त्यांनी माझा उचित सन्मान केला आहे.
- सुभाष नकाशे, लोककलावंत, नृत्यदिग्दर्शक

Web Title: 6-foot cocktail will be played in theater; 400 people participated in the workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई