कोकण रेल्वे मार्गावर ६ विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:32 AM2018-04-30T05:32:51+5:302018-04-30T05:32:51+5:30
उन्हाळी सुटीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने तुडुंब भरून जात असल्याने या मार्गावर ६ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते करमाळी दरम्यान दोन फेऱ्या
मुंबई : उन्हाळी सुटीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने तुडुंब भरून जात असल्याने या मार्गावर ६ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते करमाळी दरम्यान दोन फेऱ्या, पनवेल ते करमाळी दरम्यान सुपरफास्ट स्पेशल चार फेºया अशा एकूण सहा फेºया चालवल्या जातील.
सीएसएमटी ते करमाळी या दरम्यान १ व २ मे च्या मध्यरात्री १.३० वा. सुटेल व करमाळी ला स. ११.३० वाजता पोचेल. करमाळी येथून ही गाडी ४ मे रोजी स. १०.२० वा. सुटेल व रात्री ११.१५ वा. सीएसएमटीला पोचेल. पनवेल ते करमाळी ही गाडी पनवेल येथून २ मे व ३ मे ला मध्यरात्री ११.४० ला सुटेल व करमाळीला सकाळी ९ वाजता पोचेल. करमाळी येथून २ मे व ३ मे रोजी दुपारी २ वाजता गाडी सुटेल व पनवेलला रात्री १०.४० ला पोेचेल. या सर्व गाड्यांचे आरक्षण १ मे पासून उपलब्ध होईल.