रेल्वे रूळ ओलांडताना १४ हजार ३२७ जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:53 AM2020-01-05T00:53:32+5:302020-01-05T00:53:40+5:30

मध्य रेल्वेमार्गावरील मुंबई विभागात रेल्वे रूळ ओलांडताना जानेवारी ते सप्टेंबर २०१९ मध्ये १४ हजार ३२७ जणांना पकडण्यात आले.

6 thousand 5 persons were caught while crossing the railway line | रेल्वे रूळ ओलांडताना १४ हजार ३२७ जणांना पकडले

रेल्वे रूळ ओलांडताना १४ हजार ३२७ जणांना पकडले

Next

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील मुंबई विभागात रेल्वे रूळ ओलांडताना जानेवारी ते सप्टेंबर २०१९ मध्ये १४ हजार ३२७ जणांना पकडण्यात आले. या प्रवाशांकडून ३१ लाख ४४ हजार २७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेमार्गावरील सीएसएमटी, दादर, कुर्ला, एलटीटी, माटुंगा, घाटकोपर, ठाणे, दिवा या स्थानकांदरम्यान जास्त प्रमाणात रेल्वे रूळ ओलांडले जातात. रेल्वे सुरक्षा बलाकडून विविध मोहिमा राबवून, रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखले जाते. यासह त्यांच्यावर कारवाई केली जाते. जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये १४ हजार ३२७ जणांवर कारवाई करण्यात आली. यातून ३१ लाख ४४ हजार २७० रुपयांचा दंड वसूल केला.
जानेवारी ते सप्टेंबर २०१९मध्ये लोकलच्या छतावरून प्रवास करणाºया ३७४ जणांवर कारवाई करण्यात आली. यातून एक लाख ३३ हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, १० हजार ३१२ अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करून ६६ लाख ८८ हजार १४० रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
>प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, लोकलच्या छतावरून प्रवास करू नये यासाठी मोहिमा राबवत आहे. शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमार्फत स्थानकावर पथनाट्य सादर करून दाखविण्यात येतात. प्रवाशांच्या सुविधेसाठी पादचारी पूल, सरकते जिने उभारण्यात आले आहेत. याचा वापर करण्याचे आवाहन केले जाते, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली.

Web Title: 6 thousand 5 persons were caught while crossing the railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.