लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या २४ तासात मुंबईत ८ हजार ८३४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ७० हजार ८३२ झाली आहे. सध्या ८७ हजार ३६९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकाच दिवसात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांप्रमाणे मृतांचा आकडाही वाढतो आहे.आतापर्यंत कोरोनामुळे १२ हजार २९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या जरी वाढत असली तरी मुंबईत दिवसभरात कोरोनावर ६ हजार ६१७ रुग्णांनी मात केली आहे. आतापर्यंत एकूण ४ लाख ६९ हजार ९६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानुसार मुंबईत कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ८२ टक्के आहे. मुंबईत एकूण ४७ हजार २५३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत एकूण ४ कोटी ८ लाख ९९ हजार ५ कोरोना चाचण्या करण्यास दिल्या आहेत. १० ते १६ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.५७ टक्के असल्याची नोंद आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवसांवर गेला आहे.