मुंबईत ६ हजार ९४३ रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:16 AM2021-01-08T04:16:21+5:302021-01-08T04:16:21+5:30

मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. २८ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड ...

6 thousand 943 patients under treatment in Mumbai | मुंबईत ६ हजार ९४३ रुग्ण उपचाराधीन

मुंबईत ६ हजार ९४३ रुग्ण उपचाराधीन

Next

मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. २८ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्के असल्याची नोंद आहे. तर शहर - उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५७ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ६ हजार ९४३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

शहर - उपनगरात सोमवारी ५७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर २ लाख ७६ हजार ३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात ५१६ रुग्ण आणि तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९४ हजार ९८५ रुग्ण असून, मृतांची संख्या ११ हजार १३८ वर पोहोचली आहे.

मुंबईत झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात २१५ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २ हजार १५८ वर पोहोचली आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १,९७९ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.

Web Title: 6 thousand 943 patients under treatment in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.