मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. २८ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्के असल्याची नोंद आहे. तर शहर - उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५७ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ६ हजार ९४३ रुग्ण उपचाराधीन आहेत.
शहर - उपनगरात सोमवारी ५७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर २ लाख ७६ हजार ३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात ५१६ रुग्ण आणि तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९४ हजार ९८५ रुग्ण असून, मृतांची संख्या ११ हजार १३८ वर पोहोचली आहे.
मुंबईत झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात २१५ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २ हजार १५८ वर पोहोचली आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १,९७९ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.