एएसआय मीना यांच्या कुटुंबाला ६० लाखांची मदत;  मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:22 PM2023-08-02T14:22:27+5:302023-08-02T14:22:48+5:30

मृत एएसआय टीकाराम मीनांच्या कुटुंबाला सुमारे ६० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानापोटी २५, रेल्वे सुरक्षा कल्याण निधीअंतर्गत १५, ग्रॅच्युटी १५ लाख रुपये व  शिल्लक रजा, विमा, आदी मिळून ही मदत असेल.

60 lakh aid to ASI Meena's family; 10 lakh assistance to the heirs of deceased passengers | एएसआय मीना यांच्या कुटुंबाला ६० लाखांची मदत;  मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाखांची मदत

एएसआय मीना यांच्या कुटुंबाला ६० लाखांची मदत;  मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाखांची मदत

googlenewsNext

मुंबई :  जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आरपीएफ जवानाने वरिष्ठ आरपीएफ अधिकारी आणि तीन प्रवाशांवर गोळी झाडली. यात चौघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत प्रवाशांच्या वारसांना मंगळवारी पश्चिम रेल्वेकडून १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) जवान चेतन सिंह याने त्याच्या  सर्व्हिस वेपनमधून १२ फैरी झाडून गोळीबार केला. यात एएसआय टीकाराम मीना, अब्दुल कादिर, असगर किया  आणि सईद सैफउद्दीन मोईमुद्दीन यांचा मृत्यू झाला.  

मृत एएसआय टीकाराम मीनांच्या कुटुंबाला सुमारे ६० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानापोटी २५, रेल्वे सुरक्षा कल्याण निधीअंतर्गत १५, ग्रॅच्युटी १५ लाख रुपये व  शिल्लक रजा, विमा, आदी मिळून ही मदत असेल.

उच्चस्तरीय चौकशी
जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबाराची सर्वसमावेशक चौकशी करण्यासाठी अतिरिक्त महासंचालक/आरपीएफ (उच्च प्रशासकीय श्रेणी) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.  पी. सी. सिन्हा, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त/पश्चिम रेल्वे; अजॉय सदनी, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त/मध्य रेल्वे; नरसिंग आदींच्या द्वारे ही चौकशी होणार आहे.

सात दिवसाची पोलिस कोठडी
या हत्याकांडातील आरोपी रेल्वे सुरक्षा दलाचा जवान (आरपीएफ) चेतन सिंह (३३) याला बोरिवली दंडाधिकाऱ्यांनी ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आहे. 
 

Web Title: 60 lakh aid to ASI Meena's family; 10 lakh assistance to the heirs of deceased passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.