Join us  

Maharashtra Corona Updates: अलर्ट! तिसऱ्या लाटेत राज्यात ६० लाख, तर मुंबईत दिवसाला १.३ लाख रुग्ण आढळतील; आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 3:39 PM

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल ६० लाखांपर्यंत जाऊ शकतो. तर राज्यात मुंबई आणि पुण्यातून सर्वाधिक रुग्णांची नोंद केली जाऊ शकते, असा अंदाज सार्वजनिक आरोग्य विभागानं व्यक्त केला आहे.

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल ६० लाखांपर्यंत जाऊ शकतो. तर राज्यात मुंबई आणि पुण्यातून सर्वाधिक रुग्णांची नोंद केली जाऊ शकते, असा अंदाज सार्वजनिक आरोग्य विभागानं व्यक्त केला आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत ११ मार्च रोजी दिवसाला ९१,१०० नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याचं शिखर गाठलं गेलं होतं. तिसऱ्या लाटेत हाच आकडा मुंबईसाठी दिवसाला १ लाख ३६ हजार रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो. तर पुण्यात १९ मार्च रोजी दिवसाला १.२५ लाख रुग्णांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेत हाच आकडा तब्बल १.८७ लाख रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो. (60 lakh cases likely in Maharashtra in third wave Mumbai may see 1.3 lakh cases on peak day)

"राज्यात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला त्यासाठीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याची गरज आहे आणि त्यादृष्टीनं काम सुरू आहे", असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. 

मुंबईत तिसऱ्या लाटेच्या अंदाजात व्यक्त करण्यात आलेलं शिखर हे १.३६ लाख रुग्ण इतकं आहे. यात ८८ हजार ८२३ रुग्णांना होम क्वारंटाइन, ४७ हजार ९२८ रुग्णांना रुग्णालयात आणि ९५७ रुग्णांना आयसीयू बेड्सची गरज भासू शकते, असा अंदाजित आकडा वर्तविण्यात आलं आहे.  

पुण्याच्याबाबतीत १.२१ लाख रुग्णांवर होम क्वारंटाइन आणि १३१४ रुग्णांना आयसीयू बेड्सची गरज भासू शकते. ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णवाढीचं शिखर ८६ हजार ७३२ इथवर पोहोचलं होतं. तर तिसऱ्या लाटेत हाच आकडा १.३ लाखांपर्यंत पोहोचू शकतो आणि ९११ जणांना आयसीयू बेड्सची गरज भासू शकते. 

नागपूरमध्ये रुग्णसंख्या ८० हजारांवरुन वाढून १.२१ लाख इतकी होऊ शकते. यात ८५० जणांना आयसीयू बेड्सची गरज पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईला तिसऱ्या लाटेत २५० मेट्रीक टन इतका ऑक्सिजनची गरज भासू शकते. तर पुण्यात हाच आकडा २७० मेट्रीक टन इतका होऊ शकतो. ठाण्यात १८७ एमटी, नागपुरात १७५ एमटी आणि नाशिकला ११४ एमटी इतका ऑक्सिजनची गरज पडू शकते. 

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या