Join us

राज्य उत्पादन शुल्क विभागातील ६० जणांना दुय्यम निरीक्षक पदी कायमस्वरूपी बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 4:57 AM

राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यभरातील ६० जवान व सहाय्यक दुय्यम निरीक्षकांना दुय्यम निरीक्षक म्हणून कायमस्वरूपी बढती देण्यात आली आहे. तर, ७३ जणांना तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे.

- खलील गिरकरमुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यभरातील ६० जवान व सहाय्यक दुय्यम निरीक्षकांना दुय्यम निरीक्षक म्हणून कायमस्वरूपी बढती देण्यात आली आहे. तर, ७३ जणांना तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्या स्वाक्षरीने सोमवारी या बढत्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दुय्यम निरीक्षक म्हणून तात्पुरती पदोन्नती मिळालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवानांची पदावनती करून त्यांना त्यांच्या जवान या मुळ पदावर पाठवण्याचे निर्देश २ मे रोजी विभागातर्फे काढण्यात आले होते. मात्र, प्रशासकीय पातळीवर तात्पुरती पदोन्नती देताना ११ महिन्यांसाठीच दिली जाते, त्यामुळे त्यांची पदावनती झाल्याची ओरड चुकीची असल्याचे स्पष्टीकरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने व पुरेसा अधिकारी वर्ग उपलब्ध नसल्याने विभागातील जवान व सहाय्यक दुय्यम निरीक्षक यांना ११ महिन्यांसाठी दुय्यम निरीक्षक म्हणून तात्पुरती पदोन्नती देण्याची प्रशासकीय सोय गेल्या चार वर्षांपासून केली जात आहे. आज काढण्यात आलेल्या बढतीच्या आदेशामध्ये ६० जणांना सेवाज्येष्ठतेचा विचार करून कायमस्वरूपी पदोन्नती देण्यात आली आहे. तर, ७३ जणांना ३१ मार्च २०१९ पर्यंत किंवा राज्य लोकसेवा आयोगाकडून उमेदवार उपलब्ध होईपर्यंत ही पदोन्नती देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीनंतर पदोन्नती आपोआप संपुष्टात येईल व त्यांना पुन्हा मुळ जागेवर परत पाठवण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान संवर्गातून दुय्यम निरीक्षक (गट क) या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याबाबत ४ मे रोजी बैठक झाली होती. त्यानंतर सोमवारी पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. दुय्यम निरीक्षकपदी तात्पुरती पदोन्नती मिळालेल्यांमध्ये १२ सहाय्यक दुय्यम निरीक्षक व इतर जवान यांचा यामध्ये समावेश आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान संवर्गातून दुय्यम निरीक्षक (गट क) या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याबाबत ४ मे रोजी बैठक झाली होती. त्यानंतर सोमवारी पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. दुय्यम निरीक्षकपदी तात्पुरती पदोन्नती मिळालेल्यांमध्ये १२ सहाय्यक दुय्यम निरीक्षक व इतर जवान यांचा यामध्ये समावेश आहे.

टॅग्स :सरकारकर्मचारी