दादरमधील ६० यात्रेकरूंची राजस्थान सहलीच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:06+5:302021-06-30T04:06:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राजस्थान सहलीच्या नावाखाली दादरमधील ६० यात्रेकरूंची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात ...

60 pilgrims from Dadar cheated under the guise of Rajasthan Sahali | दादरमधील ६० यात्रेकरूंची राजस्थान सहलीच्या नावाखाली फसवणूक

दादरमधील ६० यात्रेकरूंची राजस्थान सहलीच्या नावाखाली फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राजस्थान सहलीच्या नावाखाली दादरमधील ६० यात्रेकरूंची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभादेवीत राहणारे शैलेंद्र माळी (५४) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर, २०१९ मध्ये त्यांच्यासह एकूण ६० जणांसाठी राजस्थान सहलीसाठी दादरच्या डेस्टिनेशन यारीकडे त्यांनी बुकिंगबाबत चौकशी केली, तेव्हा कंपनीच्या दीपक पावसकरने एकूण ५ लाख ६० हजार रुपये खर्च सांगितला. त्यानुसार, १ नोव्हेंबर रोजी सहल ठरली. त्यांनी पैसे भरले. सहलीच्या आदल्या दिवशी पावसकरने आजारी असल्याचे कारण पुढे करत यात्रा रद्द केली. त्यानंतर, अद्यापपर्यंत पैसे परत न केल्याने माळी यांनी दादर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली. त्यानुसार, पाेलीस अधिक तपास चाैकशी करत आहेत.

.................................................

Web Title: 60 pilgrims from Dadar cheated under the guise of Rajasthan Sahali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.