मुंबई : कोरोना रुग्ण कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ४ ऑगस्टपासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. दुकानदारांना ६० टक्के प्रतिसाद मिळत आहे.
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह म्हणाले की, राज्यात एकूण १३ लाख दुकानदार आहेत, तर मुंबईत साडेतीन लाख दुकाने आहेत. कोरोनाच्या काळात निर्बंधामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू होती. इतर दुकाने बंद होती. दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अत्यावश्यक नसणारी दुकाने सुरू केल्यानंतर वेळमर्यादेत टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. आता रात्री दहापर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा आहे, पण अद्यापही पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. कोरोनापूर्वीच्या स्थितीत आता केवळ ६० टक्के ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.