राज्यात दिवसभरात ६० हजार २२६ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:07 AM2021-05-10T04:07:14+5:302021-05-10T04:07:14+5:30
मुंबई : राज्यात रविवारी दैनंदिन रुग्णांची संख्या ४८ हजार ४०१ इतकी होती. ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात ...
मुंबई : राज्यात रविवारी दैनंदिन रुग्णांची संख्या ४८ हजार ४०१ इतकी होती. ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील २४ तासांत ६० हजार २२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ४४ लाख ७ हजार ८१८ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. सध्या ६ लाख १५ हजार ७८३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४ टक्के असून मृत्यूदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९४ लाख ३८ हजार ७९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६ लाख ९६ हजार ८९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून, २६ हजार ९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५१ लाख १ हजार ७३७ झाली असून, बळींचा आकडा ७५ हजार ८४९ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ५७२ मृत्यूंपैकी ३१० मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत, तर १२६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १३६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ५७२ मृत्यूंमध्ये मुंबई ६८, ठाणे २, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा ९, कल्याण डोंबिवली मनपा ५०, भिवंडी निजामपूर मनपा १ मीऱा भाईंदर मनपा ३, पालघर ३, वसई विरार मनपा १, रायगड ५, पनवेल मनपा ६, नाशिक ११, नाशिक मनपा ३८, अहमदनगर २२, अहमदनगर मनपा ६, जळगाव १०, जळगाव मनपा १, नंदूरबार १०, पुणे ८, पुणे मनपा १७, सोलापूर ११, सोलापूर मनपा १२, सातारा ११, कोल्हापूर १२, सांगली १६, सांगली मिरज कुपवाड मनपा ४, सिंधुदुर्ग ५, रत्नागिरी ५, जालना १०, हिंगोली १, परभणी ६, परभणी मनपा ३, लातूर २७, लातूर मनपा ४, उस्मानाबाद १०, बीड १२, नांदेड ९, नांदेड मनपा २, अकोला ३, अकोला मनपा १६, अमरावती ७, अमरावती मनपा १६, अमरावती मनपा ४, यवतमाळ १०, बुलडाणा १, वाशिम ३, नागपूर ११, नागपूर मनपा ३४, वर्धा ११, भंडारा ४, गोंदिया २, चंद्रपूर १४, चंद्रपूर मनपा १, गडचिरोली १० इत्यादी रुग्णांचा समावेश आहे.