राज्यात दिवसभरात काेरानाचे ६० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:05 AM2020-12-27T04:05:52+5:302020-12-27T04:05:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शनिवारी कोरोनाच्या २ हजार ८५४ रुग्णांचे निदान झाले, तर ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची ...

60 victims of Kairana in a day in the state | राज्यात दिवसभरात काेरानाचे ६० बळी

राज्यात दिवसभरात काेरानाचे ६० बळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शनिवारी कोरोनाच्या २ हजार ८५४ रुग्णांचे निदान झाले, तर ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्युदर २.५७ टक्के आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख १६ हजार २६३ एवढी आहे. शनिवारी १ हजार ५२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख ७ हजार ८२४ रुग्ण काेराेनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २४ लाख ५१ हजार ९१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख १६ हजार २३६ नमुणे पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात ४ लाख ६४ हजार १२१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर ३ हजार ७०४ व्यक्ती संस्थामक क्वारंटाइन आहेत. ५८ हजार ९१ सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

राज्यात इंग्लडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू आहे. त्यानुसार, आजपर्यंत आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आलेल्या प्रवाशांची संख्या १ हजार १२२ आहे. यापैकी कोरोनाबाधित आढळलेले प्रवासी १६ आहेत. यात नागपूर ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी ३, पुणे आणि नांदेड २, नांदेड, अहमदनगर आणि औरंगाबाद, रायगड प्रत्येकी १ रुग्ण आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. बाधित रुग्णांच्या निकत सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोध घेण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित कोरोनाबाधित आढळले आहेत.

......................

Web Title: 60 victims of Kairana in a day in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.