६०० टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करून होणार ४ मेगावॅट ऊर्जानिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 05:10 AM2021-02-04T05:10:56+5:302021-02-04T05:11:26+5:30

Mumbai : देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविला जाणार आहे. ६०० टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करून ४ मेगावॅट प्रतिदिन ऊर्जानिर्मिती केली जाईल.

600 MW of waste per day will be processed to generate 4 MW of energy | ६०० टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करून होणार ४ मेगावॅट ऊर्जानिर्मिती

६०० टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करून होणार ४ मेगावॅट ऊर्जानिर्मिती

Next

मुंबई :  देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविला जाणार आहे. ६०० टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करून ४ मेगावॅट प्रतिदिन ऊर्जानिर्मिती केली जाईल. शिवाय १ हजार ८०० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा आणखी एक प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी ६५ कोटींची तरतूद आहे. मुलुंड येथील क्षेपणभूमीवरील कचऱ्यावर तंत्रज्ञानाचा वापर करून जमीन पुनर्प्राप्त केली जाईल. २४ लाख २३ हजार टन कचऱ्याचे बायोमायनिंग आणि विल्हेवाट लावण्याचे नियोजन आहे. यासाठी ७५ कोटींची तरतूद आहे.
बांधकाम, निष्कासनामधून निर्माण होणाऱ्या १ हजार २०० टन प्रतिदिन डेब्रिजची विल्हेवाट लावण्याससाठी १ कोटींची तरतूद आहे.  

कचऱ्याचे प्रमाण दररोज  १० मेट्रिक टन कमी होणार
 
मुंबई : ओल्या कचऱ्यापासून खत आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याकरिता प्रोत्साहन म्हणून मालमत्ता करातील सर्वसाधारण करात १० टक्के सूट देण्याच्या योजनेमुळे कचऱ्याचे प्रमाण १० मेट्रिक टन प्रतिदिनपर्यंत कमी होईल.
सुक्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाकरिता कुलाबा येथे सुका कचरा वर्गीकरण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. प्रतिदन ४ टन क्षमता असलेल्या घरगुती घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्यासह कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत चेंबूर, देवनार, घाटकोपर, भायखळा, चारकोप येथे वायू गुणवत्ता मॉनिटरिंग स्टेशन स्थापित करण्यात येणार आहे. त्यामुळे सफरव्यतिरिक्त शहराच्या विविध भागांत वायू गुणवत्ता पातळीची वास्तविक माहिती तात्काळ प्राप्त होईल. आश्रय योजना ३४ ठिकाणी राबविली जाईल. ३०० आणि ६०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या १२ हजार ६९८ सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. यासाठी ५०० कोटींची तरतूद आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ६२७.३२ कोटींची तरतूद आहे.

Web Title: 600 MW of waste per day will be processed to generate 4 MW of energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई