मुंबई : महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांनी चांगलाच जोर पकडला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नाल्यांच्या कामांची पाहणी सुरु केली असतानाच दुसरीकडे पावसाळ्यात अतिधोकादायक आणि धोकादायक इमारत कोसळून हानी होऊ नये म्हणून महापालिका सरसावली आहे. सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ६१९ अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली असून, सर्वाधिक अतिधोकादायक इमारती कुर्ल्यात असून त्यांची संख्या ११० आहे.पालिका आणि म्हाडा ही दोन्ही प्राधिकरणे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी जाहीर करतात. यादी जाहीर करतानाच त्या इमारतीला रितसर नोटीस देत रहिवाशांना इमारत रिकामी करण्यास सांगितली जाते. परंतु, प्रत्येकवर्षी इमारत रिकामी करण्यासह इमारत पाडण्यात दोन्ही प्राधिकरणाला पुरेसे यश येत नाही. परिणामी, याचा सारासार विचार करत मुंबई पालिका आतापासूनच कामाला लागली आहे. सद्यस्थितीमध्ये पालिकेने तयार केलेल्या यादीमध्ये ६१९ अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. इमारतीवर कारवाई करतानाच त्या इमारतींची वीज आणि पाणी जोडणी तोडली जाणार आहे. पालिकेच्या यादीत एल विभागात म्हणजे कुर्ल्यात सर्वाधिक अतिधोकादायक इमारती असून, या इमारतींची संख्या ११० आहे. ए विभागात ६, बी २, सी २, डी ४, ई ७, एफ-दक्षिण १०, एफ-उत्तर ३९, जी-दक्षिण ११, जी-उत्तर १२, एच-पूर्व १९, एच-पश्चिम ३१, के-पूर्व २९, के-पश्चिम २९, पी-दक्षिण १५, पी-उत्तर ४५, आर-दक्षिण १५, आर-मध्य ३१, आर-उत्तर ११, एम-पूर्व २, एम-पश्चिम ३२, एन ५१, एस १०, टी विभागात ४९ इमारती अतिधोकादायक असून, मालमत्ता विभागाच्या ताब्यातील इमारतींची संख्या ४४ आहे.्रपावसाळ्याआधीचे सर्वेक्षणगेल्या वर्षी महापालिकेने ५५५ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती.पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते.रहिवासी इमारत रिकामी करीत नसल्याने वीज, पाणी तोडण्याचा मार्ग अवलंबिला जातो.राजकीय हस्तक्षेप आणि कारवाईवर रहिवासी स्थगितीमुळे तिढा कायम राहतो.दुसरीकडे सरकारजवळ नवे संक्रमण शिबिर बांधण्यासाठी जागा निर्धारित नाही.परिणामी, कार्यवाही अपूर्णराहते आणि इमारतींचा आकडा वाढत जातो.च्ए विभाग ६ च् बी २ च् सी २ च् डी ४ च् ई ७ च् एफ-दक्षिण १० च् एफ-उत्तर ३९च् जी-दक्षिण ११ च् जी-उत्तर १२ च् एच-पूर्व १९ च् एच-पश्चिम ३१ च् के-पूर्व २९च् के-पश्चिम २९ च् पी-दक्षिण १५ च् पी-उत्तर ४५ च् आर-दक्षिण १५ च् आर-मध्य ३१च् आर-उत्तर ११ च् एम-पूर्व २ च् एम-पश्चिम ३२ च् एन ५१ च् एस १० च् टी विभाग ४९
मुंबईत ६१९ इमारती अतिधोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:32 AM