मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सोलापूर विभागात पायाभूत सुविधेच्या उभारणीसाठी १६ ते २० ऑगस्ट आणि २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे यामार्गावरील ६२ मेल, एक्स्प्रेस रद्द केल्या जाणार आहेत. यासह मुंबईहून जाणाऱ्या २४ मेल, एक्स्प्रेस रद्द केल्या असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.१५ ते १७ ऑगस्ट आणि २२ ते २४ ऑगस्ट सीएसएमटी ते पंढरपूर पॅसेंजर, १६ ते १८ ऑगस्ट आणि २३ ते २५ ऑगस्ट पंढरपूर ते सीएसएमटी पॅसेंजर, १८ ते २१ ऑगस्ट आणि २५ ऑगस्ट सीएसएमटी ते बिजापूर पॅसेंजर, १९ ते २२ ऑगस्ट आणि २६ आॅगस्ट बिजापूर ते सीएसएमटी, २१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस- एच. एस. नांदेड एक्स्प्रेस, २२ ऑगस्ट रोजी एच. एस. नांदेड एक्स्प्रेस-लोकमान्य टिळक टर्मिनस, १८ ते २३ ऑगस्ट लोकमान्य टिळक टर्मिनस-कोयंम्बत्तूर, २० ते २५ ऑगस्ट कोयंम्बत्तूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस, १७ ते २४ ऑगस्ट लोकमान्य टिळक टर्मिनस- कराईकल, १९ ते २६ ऑगस्ट कराईकल- लोकमान्य टिळक टर्मिनस, १६ ते २३ आॅगस्ट लोकमान्य टिळक टर्मिनस ते मधुराई, १७ ते २४ आॅगस्ट मधुराई ते लोकमान्य टिळक टर्मिनस, २० ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते बिदार, २१ आॅगस्ट रोजी बिदार ते लोकमान्य टिळक टर्मिनस, १५ ते २२ आॅगस्ट दादर ते चेन्नई सुपर फास्ट एक्स्प्रेस, १७ ते २४ आॅगस्ट चेन्नई ते दादर सुपरफास्ट एक्स्प्रेस, १६ ते २२ आॅगस्ट हैदराबाद-सीएसएमटी, १७ ते २३ आॅगस्ट सीएसएमटी-हैदराबाद, १७ ते २१ आॅगस्ट काकीनाडा पोर्ट ते लोकमान्य टिळक टर्मिनस, १८ ते २२ आॅगस्ट लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट, १७, १९ आॅगस्ट ते २३ आॅगस्ट पनवेल ते एच. एस. नांदेड एक्स्प्रेस, १६, १८ आॅगस्ट ते २२ आॅगस्ट एच. एस. नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस, १५ ते २५ आॅगस्ट सीएसएमटी ते साईनगर शिर्डी पॅसेंजर, १६ ते २६आॅगस्ट साईनगर शिर्डी ते सीएसएमटी पॅसेंजर रद्द करण्यात येणारआहेत.
पायाभूत सुविधेच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेच्या ६२ मेल, एक्स्प्रेस रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 4:26 AM