Join us

६२ टक्के लोकांना असे वाटते की स्थावर मालमत्ता बाजारपेठेत उतरण्यासाठी हा सर्वोत्तम काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना महामारीमुळे आपले स्वतःचे घर खरेदी करण्याला प्राधान्य देण्याची तीव्र इच्छा लोकांच्या मनात निर्माण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना महामारीमुळे आपले स्वतःचे घर खरेदी करण्याला प्राधान्य देण्याची तीव्र इच्छा लोकांच्या मनात निर्माण झाली आहे आणि घर खरेदी करण्याच्या निर्णय प्रक्रियेवरदेखील खूप प्रभाव पडला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात सहभागी झालेल्या जवळपास ६२ टक्के लोकांनी असे मत व्यक्त केले की, स्थावर मालमत्ता बाजारपेठेत उतरण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. अगदी मिलेनियल्सदेखील स्वतःचे घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.

गेल्या वर्षभरात सर्वच व्यावसायिक कामांमध्ये डिजिटलायझेशन अतिशय वेगाने वाढले आहे आणि नव्या सर्वसामान्य परिस्थितीमध्ये बहुतांश मार्केटिंग मोहिमांसाठी डिजिटलला प्राधान्य देण्याचे धोरण राबविले जात आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विविध मोहिमा सुरू झाल्या आहेत. ज्यामुळे घर खरेदीदारांचे आर्थिक ओझे हलके झाले. देशविदेशातील ग्राहकांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला. सर्व निम-शहरी बाजारपेठांमधील संभावित घर खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पारंपरिक दृष्टिकोन समोर ठेवला जात आहे. अनेकांनी डिजिटल मार्केटिंग योजनेचा पर्याय निवडला आहे, असे गृह निर्माण क्षेत्रातील अभ्यासक सार्थक सेठ यांना वाटते.

गृहनिर्माण क्षेत्रातील अभ्यासक अभिजित माहेश्वरी यांच्या मते महामारी आणि लॉकडाऊन यानंतर वर उठण्याची फक्त सुरुवात निवासी स्थावर मालमत्ता क्षेत्राने केली होती. तेवढ्यात दुसऱ्या लाटेने वैयक्तिक आणि संघटनात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर आणखी जास्त नुकसान करायला सुरुवात केली. आपली घरे जास्त चांगली असावीत किंवा क्वारंटाईन आयुष्य अधिक सोपे व्हावे यासाठी जास्त चांगले, जास्त मोठे घर घेता यावे, अशी लोकांची इच्छा आहे.