Join us

राज्यात ६२ हजार सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:10 AM

मुंबई : राज्यात सोमवारी ५,८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६१,९५,७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...

मुंबई : राज्यात सोमवारी ५,८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६१,९५,७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के झाले आहे. सध्या ६२,४५२ रुग्ण उपचाराधिन आहेत.

राज्यात दिवसभरात ४,१४५ रुग्णांचे निदान झाले असून, १०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२.५३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३,५३,१२९ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत, तर २,५३० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,९६,८०५ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ३४ हजार १३९ आहे. दिवसभरात नोंद झालेल्या १०० मृत्यूंमध्ये मुंबई ३, नवी मुंबई मनपा २, कल्याण-डोंबिवली मनपा २, पालघर १, वसई-विरार मनपा १, रायगड २, पनवेल मनपा १, अहमदनगर ३, जळगाव १, जळगाव मनपा १, सोलापूर ६, सातारा ११, कोल्हापूर ३, सांगली ४, सांगली-मिरज-कुपवाड मनपा १, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी ९, औरंगाबाद ३६, औरंगाबाद मनपा १०, बीड २ अशा रुग्णांचा समावेश आहे.