मुंबई : मान्सून मुंबईत दाखल होण्यापूर्वी सोमवारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे काही भागांमध्ये वीजपुरवठाही काही काळासाठी खंडित झाला होता. गेल्या दोन वर्षांत वीजपुरवठा खंडित होण्याच्या शेकडो तक्रारी बेस्ट उपक्रमाकडे आल्या आहेत. यंदाच्या पावसाळ्यात ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट प्रशासनाने विद्युत पुरवठा विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बेस्ट उपक्रमामार्फत शहर भागात वीजपुरवठा केला जातो. परंतु कर्मचारी संख्येअभावी गेल्या काही वर्षांत वीजपुरवठा वेळेत पूर्ववत होण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे समजते. पावसाळ्यात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साठणे व वाहतूककोंडीची शक्यता अधिक असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी थोडा विलंब होईल, असे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी १३ फिरत्या गाड्या ठेवण्यात आल्या असून तक्रार येताच कर्मचारी दुरुस्तीसाठी धाव घेतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.ग्राहकांनो, हे करू नका...च्वीज मापकांच्या केबिनमध्ये पाणी गळत असल्यास हातमोजे, रबरी बूट, लाकडी अथवा इन्सुलेटेड प्लॅटफार्मचा वापर केल्याशिवाय संच मांडणीस स्पर्श करू नये.च्कोणत्याही परिस्थितीत विजेची ठिणगी पडत असले तसेच पाणी गळत असेल तर मार्गप्रकाश स्तंभांना, रस्त्यावर असणाºया लाल रंगाच्या डिस्ट्रिब्युशन पिलर्स व केबिनमधील वीज मापकांना स्पर्श करु नका.च्विशेषत: ज्या सदनिकांना अथवा इमारतींना तात्पुरता पुरवठा देण्यात आला आहे. त्यांनी अत्यावश्यक विद्युत उपकरणांचा वापर करावा.