मुदतवाढीसाठी ६२१ सोसायट्यांचे पत्र, उर्वरित सोसायट्यांचा कचरा न उचलण्याचा पालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 02:59 AM2017-10-24T02:59:10+5:302017-10-24T02:59:14+5:30
मुंबई : दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणा-या सोसायट्यांना आपल्याच आवारात कच-यावर प्रक्रिया करण्याची सक्ती महापालिकेने केली आहे.
मुंबई : दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणा-या सोसायट्यांना आपल्याच आवारात कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती महापालिकेने केली आहे. मात्र सोसायट्या प्रतिसाद देत नसल्याने हा प्रकल्प उभारू याची लेखी हमी देण्यासाठी पालिकेने १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपत आली तरी ४ हजार १४० सोसायट्यांपैकी केवळ ६२१ सोसायट्यांनी लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे शक्य असतानाही प्रक्रिया न करणाºया उर्वरित सोसायट्यांचा कचरा उचलायचा नाही, असा निर्णय पालिकेने घेतला आहे.
मुंबईवर कचरा संकट ओढावल्याने महापालिकेने मोठ्या सोसायट्या व आस्थापनांना आपल्या इमारत परिसरात कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती केली आहे. मात्र आतापर्यंत फक्त ३६१ सोसायट्यांनीच ही प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया राबवली नाही, अशा सोसायट्यांनी अजून तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. त्यावर लेखी हमीपत्र दिल्यास तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्याची तयारी पालिका प्रशासनाने दाखविली. या मुदतीत लेखी हमी न दिल्यास अशा सोसाट्यांचा कचरा उचलणार नाही. अशा ४ हजार १४० सोसायट्यांना पालिका नव्याने नोटीस पाठविणार आहे. लेखी हमीपत्र देण्यासाठी १५ दिवसांची असलेली मुदत संपण्यास तीन दिवस शिल्लक आहेत. या मुदतीत ४ हजार १४० सोसायट्यांपैकी फक्त ६२१ सोसायट्यांनीच प्रक्रिया राबवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्यासाठी लेखी हमीपत्र दिले आहे.
।...अन्यथा कचरा उचलणार नाही
कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी मुदतवाढ हवी असल्यास १५ दिवसांत लेखी हमीपत्र द्या, असे पालिकेने सोसायट्यांना कळवले होते. मात्र याकडे बहुतांशी सोसायट्यांनी दुर्लक्ष केले आहे.
ज्यांच्याकडे जागा नाही किंवा अजून काही अडचणी असतील, अशा सोसायट्यांचा विचार करून पर्याय काढला जाईल. मात्र ज्यांना शक्य आहे, अशा सोसायट्यांनी ही प्रक्रिया राबवणे बंधनकारक आहे. मात्र तसे न केल्यास अशा सोसायट्यांचा कचरा पालिका उचलणार नाही.