Join us

राज्यात काेराेनाचे ६ हजार २८१ नवे रुग्ण, ४० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मागील आठवड्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढा असल्याचे चित्र आहे. शनिवारी ६ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मागील आठवड्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढा असल्याचे चित्र आहे. शनिवारी ६ हजार २८१ रुग्ण आणि ४० मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांचा एकूण आकडा २० लाख ९३ हजार ९१३ झाला असून, बळींची संख्या ५१ हजार ७५३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१६ टक्के असून मृत्युदर २.४७ टक्के आहे.

राज्यात शनिवारी दिवसभरात २ हजार ५७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १९ लाख ९२ हजार ५३० रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ४८ हजार ४३९ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५६ लाख ५२ हजार ७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.३८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २८ हजार ६० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १ हजार ६१० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

* दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ कायम

कालावधी व रुग्णसंख्या

२० फेब्रुवारी - ६,२८१

१९ फेब्रुवारी - ६,११२

१८ फेब्रुवारी - ५,४२७

१७ फेब्रुवारी - ४,७८७

१६ फेब्रुवारी - ३,६६३

--------------------------