मतदार यादीबाबत अवघ्या ६३ तक्रारी

By admin | Published: March 29, 2017 06:12 AM2017-03-29T06:12:06+5:302017-03-29T06:12:06+5:30

शिवसेना-भाजपासाठी वर्चस्वाची लढाई ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील मतदार यादीबाबत मोठा गोंधळ झाला

63 complaints against voters list | मतदार यादीबाबत अवघ्या ६३ तक्रारी

मतदार यादीबाबत अवघ्या ६३ तक्रारी

Next

मुंबई : शिवसेना-भाजपासाठी वर्चस्वाची लढाई ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील मतदार यादीबाबत मोठा गोंधळ झाला असला तरी प्रत्यक्षात त्याबाबत केवळ ६३ तक्रारी निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. तब्बल ११ लाखांवर मतदारांची नावे गायब असताना याबाबत अत्यल्प जणांनी आयोगाकडे आक्षेप नोंदवल्याची माहिती अधिकार कायद्यान्वये समोर आली आहे.
फेबु्रवारी २०१७ मध्ये झालेल्या मुंबई पालिका निवडणुकीबाबत आरटीआय कार्यकर्ते यांनी मतदार यादीबाबत किती तक्रारी आल्या, याबाबत निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली होती.
त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक मतदार यादीबाबत केवळ ६३ अर्ज प्राप्त झाल्याचे समोर आले. त्यात २०१२ ते २०१७ या कालावधीत एकूण मतदारांची संख्या अनुक्रमे १,०२,८६,५७९ व १,९१,८०,५५५ इतकी होती. २०१२ च्या तुलनेत या निवडणुकीत तब्बल ११ लाख ६ हजार २४ एवढी तफावत आहे. तथापि, मतदार यादीबाबत अवघ्या ६३ अर्जांमुळे मतदार अजूनही जागरूक नसल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 63 complaints against voters list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.