मुंबई : जागतिक प्रवाशांच्या संख्येत आॅक्टोबरमध्ये ६.३ टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. आशिया पॅसिफिक या विभागाचा हिस्सा यात सर्वाधिक ३३.८ टक्के आहे. गत वर्षाच्या आॅक्टोबरमध्ये तुलनेत ही वाढ ६.३ टक्के आहे. तर, सप्टेंबर २०१८ च्या ५.५ टक्क्यांच्या तुलनेत ही वाढ १.८ टक्क्यांनी अधिक आहे. सप्टेंबर महिन्यातील निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आॅक्टोबरची वाढ दिलासादायक आहे. जागतिक विमान प्रवाशांमध्ये आशिया पॅसिफिक विभागाच्या ३३.८ टक्के, युरोप २६.७, उत्तर अमेरिकेचा हिस्सा २२.८ टक्के आहे. मध्य पूर्वेचा ९.४, लॅटिन अमेरिकेचा ५.१ तर, आफ्रिकेचा हिस्सा २.२ टक्के आहे.
जागतिक विमान प्रवाशांच्या संख्येत ६.३ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 5:06 AM