उद्धवांसह शिवसेनेचे ६३ आमदार आज एकवीरेच्या दर्शनाला

By admin | Published: November 3, 2014 11:24 PM2014-11-03T23:24:32+5:302014-11-03T23:24:32+5:30

विशेष प्रतिनिधी - शिवसेना कार्यप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे ६३ आमदार कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी उद्या मंगळवारी जात आहेत.

63 MLAs of Shiv Sena along with Uddhav | उद्धवांसह शिवसेनेचे ६३ आमदार आज एकवीरेच्या दर्शनाला

उद्धवांसह शिवसेनेचे ६३ आमदार आज एकवीरेच्या दर्शनाला

Next

ठाणे : विशेष प्रतिनिधी - शिवसेना कार्यप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे ६३ आमदार कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी उद्या मंगळवारी जात आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता हेलिकॉप्टरने उद्घवजींचे काही निवडक सहकाऱ्यांसह गडावर आगमन होईल. बाकीची आमदारमंडळी वाहनाने तत्पूर्वीच दाखल झालेली असतील.
१९९०मध्ये शिवसेनेने भाजपाशी युती करून पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविली होती. मंत्रालयावर भगवा फडकविणारच हा साहेबांचा निर्धार होता. परंतु महाराष्ट्राची सत्ता युतीच्या हातून थोडक्यात निसटली. व सेनेचे ५२ आणि भाजपाचे ४२ असे आमदार निवडून आले. त्यावेळी या देवस्थानाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी साहेबांना मातेच्या दर्शनासाठी येण्याची विनंती केली. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, आईला सांग मी गडावर नक्की येईन, पण तिने मंत्रालयावर भगवा फडकविण्याचे माझे स्वप्न साकार केल्यानंतरच त्यासाठी तिला माझ्यावतीने साकडे घाल. त्यानुसार तरे यांनी केले असता. १९९५ मध्ये सेना-भाजप युतीचे सरकार आले. मंत्रालयावर भगवा फडकला. तेव्हा शिवसेनाप्रमुख सर्व कुटुंबिय आणि सेनेच्या सर्व आमदारांसही, मंत्र्यांसह गडावर आले होते. मातेचे दर्शन त्यांनी घेतले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत युतीची सत्ता गेली. २००४ आणि २००९मध्ये सत्तेने युतीला हुलकावणी दिली. २००९नंतर तर शिवसेनाप्रमुख अत्यवस्थ झाले. त्यानंतर आताच म्हणजेच जवळजवळ २० वर्षांनी शिवसेनेचे आमदार सामूहिकरित्या पक्षप्रमुखांसह एकवीरा मातेच्या दर्शनाला जात आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 63 MLAs of Shiv Sena along with Uddhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.