लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात ६३ हजार २८२ रुग्णांचे निदान झाले असून राज्यातील कोरोनाचा कहर कायम आहे. त्याचप्रमाणे, दैनंदिन मृत्यूंचा आकडाही चढता असून शनिवारी ८०२ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६ लाख ६५ हजार ७५४ झाली असून मृतांची एकूण संख्या ६९ हजार ६१५ आहे. सध्या राज्यात ६ लाख ६३ हजार ७५८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८४.२४ टक्क्यांवर आला असून मृत्युदर १.४९ टक्के आहे. राज्यात शनिवारी ६१ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३९ लाख ३० हजार ३०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७३ लाख ९५ हजार २८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.०३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४० लाख ४३ हजार ८९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २६ हजार ४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या संथगतीने कमी होत असून सध्या पुण्यात सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण आहेत, ही संख्या १ लाख ४ हजार ८४९ इतकी आहे. त्याखालोखाल नागपूर ७६२९१, मुंबई ६३३२५, ठाणे ४९९८१, नाशिक ४९२५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ८०२ मृत्यूंमध्ये मुंबई ९०, ठाणे १७, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १२, उल्हासनगर मनपा २, भिवंडी निजामपूर मनपा ३, वसई विरार मनपा ५, रायगड १०, पनवेल मनपा १०, नाशिक ३१, नाशिक मनपा १०, मालेगाव मनपा ४, अहमदनगर १५, अहमदनगर मनपा १७, धुळे २, जळगाव ५, जळगाव मनपा १, नंदूरबार ५, पुणे ५, पुणे मनपा ३९, पिंपरी चिंचवड मनपा ८, सोलापूर १७, सोलापूर मनपा ४९, सातारा २५, कोल्हापूर ७, सांगली १४, सांगली मिरज कुपवाड मनपा ५, औंरगाबाद ६, औरंगाबाद मनपा २५, जालना ७, हिंगोली ५, परभणी ८, परभणी मनपा ३, लातूर १७, लातूर मनपा १०, उस्मानाबाद ३७, बीड २९, नांदेड १४, नांदेड मनपा ५, अकोला ५, अकोला मनपा ५, अमरावती १४, अमरावती मनपा ७, यवतमाळ ३१, वाशिम ७, नागपूर १६, नागपूर मनपा ४१, वर्धा १८, भंडारा २४, गोंदिया २, चंद्रपूर १९, चंद्रपूर मनपा १०, गडचिरोली ४ इ. रुग्णांचा समावेश आहे.