मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांचे आकडे वाढतच आहे. शुक्रवारी दिवसभरात ६३ हजार ७२९ नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आहे
तर, ३९८ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसासाठी निर्बंध लागू करण्यात आले असले तरी संसर्गाचा आलेख वरचाच आहे. शुक्रवारी राज्यात ६३ हजार ७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून आता राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ लाख ३ हजार ५८४ झाली आहे. तर, एकूण ६ लाख ३८ हजार ३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.१२ टक्क्यांवर आले आहे. आज ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३० लाख ४ हजार ३९१ काेरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात ३९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ५९ हजार ५५१ नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३३ लाख ८ हजार ८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७ लाख ३ हजार ५८४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख १४ हजार १८१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २५ हजार १६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.