मध्य रेल्वेकडून ६.३२ दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:32+5:302021-06-03T04:06:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : व्यवसाय विकास युनिट (बीडीयू)च्या निरंतर प्रयत्नामुळेच कोरोनाचे आव्हान असूनही मध्य रेल्वेच्या मे महिन्यात ...

6.32 million tons of freight loading from Central Railway | मध्य रेल्वेकडून ६.३२ दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग

मध्य रेल्वेकडून ६.३२ दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : व्यवसाय विकास युनिट (बीडीयू)च्या निरंतर प्रयत्नामुळेच कोरोनाचे आव्हान असूनही मध्य रेल्वेच्या मे महिन्यात मालवाहतूक लोडिंगमध्ये भर पाडली आहे. मे २०२१ मध्ये मध्य रेल्वेने ६.३२ दशलक्ष टन वाहतूक केली, जी मे २०२० मधील ४.३३ दशलक्ष टनच्या तुलनेत ४५.९ टक्के जास्त होते. मे २०२१ मध्ये ३.५७ दशलक्ष टन कोळसा, ०.२१ दशलक्ष टन लोह व स्टील, ०.५८ दशलक्ष टन सिमेंट, ०.८६ दशलक्ष टन कंटेनर आणि १.१० दशलक्ष टन खत, पीओएल इत्यादींचा समावेश असलेले इतर मालवाहतूक लोडिंग केली आहे.

एप्रिल ते मे २०२१ या काळात मध्य रेल्वेने १२.५७ दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी २०२० मधील याच कालावधीतील ७.५५ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत ६६.५ टक्क्यांनी जास्त आहे.

मध्य रेल्वेतील १२.५७ दशलक्ष टन मालवाहतुकीत मुंबई विभाग २.८३ दशलक्ष टन, भुसावळ विभाग ०.९५ दशलक्ष टन, नागपूर विभाग ७.३० दशलक्ष टन, पुणे विभाग ०.२९ दशलक्ष टन आणि सोलापूर विभाग १.२० दशलक्ष टन लोडिंगचा समावेश आहे. वर्षभरात मालवाहतुकीचा वेग जवळजवळ दुप्पट झालेला आहे.

..........................................

Web Title: 6.32 million tons of freight loading from Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.