Join us

रेल्वेच्या धोक्याच्या साखळीचा गैरवापर केला म्हणून ६३.२१ लाख रुपये दंड

By सचिन लुंगसे | Published: July 03, 2024 7:26 PM

Mumbai News: रेल्वेच्या अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. त्यानुसार, एप्रिल - २०२३ ते जून - २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेने अलार्म चेनच्या गैरवापराची ११,४३४ प्रकरणे नोंदवली आहेत.

मुंबई -  रेल्वेच्या अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. त्यानुसार, एप्रिल - २०२३ ते जून - २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेने अलार्म चेनच्या गैरवापराची ११,४३४ प्रकरणे नोंदवली आहेत. रेल्वे कायद्यानुसार ९६५७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६३.२१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईच्या उपनगरीय आणि मेल / एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी अलार्म चेन पुलिंग (एसीपी) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ट्रेनच्या लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर (गार्ड) यांना सतर्क करण्यासाठी अलार्म चेन आणीबाणीच्या परिस्थितीत खेचण्यासाठी तयार केली आहे. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि रेल्वे सेवांची वक्तशीरपणा राखण्यासाठी ट्रेनमध्ये अलार्म चेनचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

मात्र उशीरा पोहोचणे, उतरणे / मधल्या स्थानकांवर चढणे इत्यादी क्षुल्लक कारणांसाठी प्रवासी त्याचा गैरवापर करत असल्याचे निर्दशनास आले आहे. अलार्म चेनचा गैरवापर हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. यामुळे एक वर्षापर्यंत कारावास, १ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विभागनिहाय प्रकरणे, अटक केलेल्या व्यक्ती आणि वसूल दंडमुंबई विभाग : प्रकरणे - ४३८७, अटक - ३७४१, दंड वसूल - २३.४७ लाखभुसावळ विभाग : प्रकरणे - २९३१, अटक - २८२४, दंड वसूल - २१.७६ लाखनागपूर विभाग : प्रकरणे - १७०६, अटक - १४०४, दंड वसूल - ८.७१ लाखपुणे विभाग : प्रकरणे - १९९२, अटक - १४४०, दंड वसूल - ७.७३ लाखसोलापूर विभाग : प्रकरणे - ४१८, अटक - २४८, दंड वसूल - १.५४ लाख अलार्म चेन का ओढावी ?- आगीच्या घटना- आरोग्य आणीबाणी- गुन्हेगारी प्रकरणे- ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना अपघात गैरवापर केला तर काय होते ?- मागून येणाऱ्या गाड्यांवर परिणाम होतो.- मेल / एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात.- गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते. आणीबाणीत काय करावे ?आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीसाठी पर्यायी मार्ग आहेत. ट्रेनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता येतो. प्रवासी तिकीट परीक्षक, १३९ डायल करता येते. सहप्रवाशांची मदत घेता येते. प्रवाशांनी काय करावे ?प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या किमान तीस मिनिटे अगोदर स्थानकावर पोहोचून प्रवासाचे जबाबदारीने नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

टॅग्स :मध्य रेल्वेभारतीय रेल्वे