राज्यात 633 आयटीआयच्या जागा पहिल्या फेरीत फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 10:20 AM2021-09-07T10:20:14+5:302021-09-07T10:23:36+5:30

शासकीय संस्थांमधील ८१ टक्के तर खासगीमधील ३७ टक्के जागांवर प्रवेश

633 ITI seats in the state are full in the first round pdc | राज्यात 633 आयटीआयच्या जागा पहिल्या फेरीत फुल्ल

राज्यात 633 आयटीआयच्या जागा पहिल्या फेरीत फुल्ल

googlenewsNext
ठळक मुद्देआयटीआयची पहिली प्रवेश फेरीची अंतिम निवड यादी सोमवारी जाहीर झाली. यामध्ये अलॉट झालेल्या जागांमध्ये ८१ टक्के जागा या शासकीय तर ३७ टक्के जागा या खासगी आयटीआयमधील आहेत

मुंबई : आयटीआय प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ९० हजार ५४१ जागांवर विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली असून, राज्यातील 
शासकीय आणि खासगी मिळून एकूण ६३३ आयटीआयमधील अलॉटमेंट १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व 
प्रशिक्षण संचालनालयाकडून मिळाली आहे. पहिल्या फेरीत अलॉट झालेल्या जागांमध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, ड्रेस मेकिंग यासारख्या ट्रेंडची चलती दिसून आली असून, १०० टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी या ट्रेंड्सला पसंती दर्शविली आहे.

आयटीआयची पहिली प्रवेश फेरीची अंतिम निवड यादी सोमवारी जाहीर झाली. यामध्ये अलॉट झालेल्या जागांमध्ये ८१ टक्के जागा या शासकीय तर ३७ टक्के जागा या खासगी आयटीआयमधील आहेत. शासकीय आयटीआयमध्ये ७५ हजार ६१ तर खासगी आयटीआयमध्ये १५ हजार ४८० जागा अलॉट झाल्याची माहिती संचालनालयाकडून मिळाली आहे. पहिल्या फेरीत शासकीय आणि खासगी दोन्ही मिळून एकूण जागांपैकी ६८ टक्के जागांवर प्रवेश अलॉट करण्यात आले आहेत. १०० टक्के अलॉटमेंट झालेल्या संस्थांमध्ये मुंबई विभागातील ६५, पुणे विभागातील ६५, नागपूर विभागातील ६३, नाशिक विभागातील २४, अमरावती विभागातील १८३ तर औरंगाबाद विभागातील २३३ संस्थांचा समावेश आहे. यंदा राज्यातील ९७६ आयटीआयमध्ये प्रवेशाच्या एकूण १ लाख ४६ हजार २५९ जागा उपलब्ध आहेत. यामधील ४१७ शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार ३११ तर ५५९ खासगी आयटीआयमध्ये ५३ हजार ९४८ जागा उपलब्ध आहेत.

४ वर्षांतील सगळ्यात कमी अर्जनिश्चिती
मागील ४ वर्षांतील आयटीआय प्रवेशाची आकडेवारी पाहिली असता, यंदा मागील ४ वर्षांतील सगळ्यात कमी अर्जनिश्चिती झाल्याची माहिती समोर आली आहे. २०१९मध्ये आयटीआय प्रवेशासाठी सर्वाधिक म्हणजे १ लाख ४८ हजार जागा उपलब्ध होत्या आणि त्यावर्षी २ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांनी अर्जनिश्चिती केली होती. यंदा प्रवेशासाठी १ लाख ४६ जागा उपलब्ध असून, २ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी अर्जनिश्चिती केली आहे. पहिल्या वर्षी १ लाख ३८ हजार जागांसाठी तब्बल ३ लाख २ हजार विद्यार्थ्यांनी अर्जनिश्चिती केली होती. २०१७मध्ये ३ लाख २० हजार तर २०१८मध्ये ३ लाख १९ हजार विद्यार्थ्यांनी अर्जनिश्चिती केली होती. त्यामुळे यंदा आयटीआयसाठी अपेक्षेपेक्षा कमी अर्जनिश्चिती विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

आयटीआय प्रवेशाची पहिली फेरी
आयटीआय    शासकीय     खासगी    एकूण
एकूण संख्या     ४१७     ५५९    ९७६
कॅप जागा     ९२३११    ४०८०३    १३३११४
व्यवस्थापन जागा     ०    १३१४५    १३१४५
एकूण क्षमता    ९२३११    ५३९४८     १४६२५९
अलॉटमेंट     ७५०६१    १५४८०     ९०५४१
कॅप जागांचे अलॉटमेंट     ८१.३१ %     ३७.९४ %     ६८.०२ %

Web Title: 633 ITI seats in the state are full in the first round pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.