CoronaVirus News: दिलासादायक! आज ८०१८ जणांनी केली कोरोनावर मात; कोरोनामुक्त रुग्णांची संख्या लाखावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 09:48 PM2020-07-02T21:48:25+5:302020-07-02T21:48:41+5:30
राज्यात आज ८०१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यभरात आज ६,३३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १,८६,६२६ वर पोहचली आहे. राज्यात आज १२५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत ८१७८ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज ८०१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकुण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार गेली आहे. राज्यात आतापर्यत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
6,330 #COVID19 cases, 8,018 discharged & 125 deaths reported in Maharashtra today. Total number of cases in the state is now at 1,86,626, including 1,01,172 discharged & 8,178 deaths: State Health Department pic.twitter.com/pbNCGjtzcr
— ANI (@ANI) July 2, 2020
आज सोडण्यात आलेल्या ८०१८ रुग्णांमध्ये मुंबईत ७०३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुण्यात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिकात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबादमध्ये ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूरमध्ये १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूरमध्ये ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोल्यात ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूरात ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ ते ५३ टक्क्यांच्या आसपास राहीला आहे. राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.