राज्यात दिवसभरात ६३,३०९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:07 AM2021-04-30T04:07:56+5:302021-04-30T04:07:56+5:30
दैनंदिन मृत्यूचा नवा उच्चांक : ६ लाख ७३ हजार ४८१ सक्रिय रुग्ण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात बुधवारी ...
दैनंदिन मृत्यूचा नवा उच्चांक : ६ लाख ७३ हजार ४८१ सक्रिय रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बुधवारी ६३,३०९ रुग्णांचे निदान झाले असून, ९८५ मृत्यू झाले आहेत. तर राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन मृत्यूच्या उच्चांकाची नोंद झाली आहे. राज्यात सध्या ६,७३,४८१ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४४,७३,३९४ असून, मृतांचा आकडा ६७,२१४ आहे.
राज्यात दिवसभरात ६१,१८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ३७,३०,७२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४ टक्के झाले असून, मृत्यूदर १.५ टक्क्यांवर आहे. आजपर्यंत तपासलेल्या २,६५,२७,८६२ नमुन्यांपैकी १६.८६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४२,०३,५४७ व्यक्ती होम क्वारंटिन, तर ३१,१५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटिनमध्ये आहेत.