Join us

राज्यात कोरोनाचे ६४, मुंबईत १२ नवे रुग्ण

By संतोष आंधळे | Published: January 14, 2024 8:23 PM

Corona Virous: राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये रविवारी राज्यात एकूण ६४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील १२ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत.

- संतोष आंधळे मुंबई- राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये रविवारी राज्यात एकूण ६४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील १२ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात ६२४ आणि मुंबईत १५४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.  तसेच आज १११ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत जे १२ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकीकोणत्याही रुग्णाला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी १८ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात २४३  चाचण्या करण्यात आल्या आहेत.

नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्णमुंबई मनपा - १२ठाणे -१ठाणे मनपा - ८नवी मुंबई मनपा -८कल्याण डोंबिवली - १उल्हासनगर मनपा - १रायगड -१

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई